Beed News : विद्यार्थी की मेंढरं... स्कूलबसमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ ! RTO लक्ष देईल का ? (पाहा व्हिडिओ)

पालकांनी देखील स्कूल बसमध्ये विद्यार्थी सुरक्षित प्रवास करीत आहेत का हे पाहावे.
School Bus News, Beed News
School Bus News, Beed Newssaam tv
Published On

Beed News : स्कूल बसच्या नावाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे असा प्रकार बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील एका विद्यालयाच्या नजीक उघडकीस आला आहे. स्कूल बसमध्ये एक दाेन नव्हे चक्क 80 विद्यार्थी यांना मेंढरा सारखं कोंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Maharashtra News)

School Bus News, Beed News
Vasai News: भोईदापाडात पाेलिसांची जिगरबाज कामगिरी, पेटत्या कारमधून तिघांना काढलं बाहेर

स्कूल (school) बसमध्ये मेंढरं कोंडल्यासारखे लहान मुलांना बसवून शाळेसाठी वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या (beed) तेलगाव येथील जिजामाता प्राथमिक विद्यालय उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये देखील विद्यार्थ्यांना (students) बसवले जात असून त्यांच्या सुरक्षेचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

School Bus News, Beed News
Zilla Parishad परिसरात वाहन लावताना शिस्त पाळा, अन्यथा टायरची हवा साेडलीच समजा; सीईओंचा नवा प्रयाेग

स्कूल बसचे (school bus) नियम धाब्यावर बसवून एका स्कूल बसमध्ये 70 ते 80 विद्यार्थी बसवत आहेत. 10 ते 15 विद्यार्थी बसच्या केबिनमध्ये बसवले जातात. तर काही ड्रायव्हरच्या बाजूला उभे केले जातात. तसेच एका सिटवरती तीन ते चार विद्यार्थी बसवले जातात.

अनेक विद्यार्थी हे उभा राहून प्रवास करत आहेत. यामुळे अवैध विद्यार्थी प्रवास वाहतूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com