sangli, kavthe mahankal police, youth arrested saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : आईच्या हंबरड्याने पाेलीसांचेही मन हेलावले, म्हैसाळच्या कालव्यात सापडला युवकाचा मृतदेह, पाच अटकेत (पाहा व्हिडिओ)

पाेलीसांनी मृतदेह सापडल्याची माहिती देताच कुटुंबियांनी हंबरडा फाेडला.

विजय पाटील

Sangli News : समाज माध्यमातून अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील सुशिल सुर्यकांत आठवले (वय २३) या युवकाचे अपहरण करुन पाच जणांनी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पाचही संशयितांना पाेलीसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

दरम्यान म्हैसाळच्या कालव्यात टाकलेला सुशिल आठवले याचा मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (lcb) आणि कवठेमहांकाळ पोलीसांनी शोधून काढला आहे. सातव्या दिवशी लंगरपेठ गावच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सुनीलचा मृतदेह सापडला.

या प्रकरणी पोलीसांनी कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांसमोर हजर होत आपण सुनील याचा खून केला असल्याची कबूली दिली.

मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर पाेलीसांनी पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. चैतन्य नामदेव माने व सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीसांनी कवठेमहांकाळ पोलीसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणातील अनुज अमृत माने, अनिल मारुती माने व ऑल्विन संजय वाघमारे या तीन संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son Wedding: महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' आदेश बांदेकरांची सून कोण आहे?

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

Kul Kayda: मालक झालेल्या कुळांच्या शेतजमिनीची विक्री करता येते का? काय आहे कुळ कायदा?

Maharashtra Live News Update: प्राजक्ता गायकवाड लग्नबंधणात अडकणार, लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात

SCROLL FOR NEXT