Heramb Kulkarni News: समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; गाडी रोखून रॉडने मारहाण

Heramb Kulkarni : नगर जिल्ह्यात गुन्हेगारी राेखण्यासाठी प्रयत्न हाेणे आवश्यक असल्याचे मत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
Heramb Kulkarni, nagar news
Heramb Kulkarni, nagar newssaam tv
Published On

- सुशिल थाेरात

Nagar Crime News : सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले हाेणे ही गंभीरबाब आहे. माझ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाेलीस यंत्रणेने काेणतीच हालचाल केली नाही. पाेलीस खात्याने तसेच सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांवर हाेणारे हल्ले थाेपविण्यासाठी ठाेस उपाययाेजना केली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni Latest Marathi News) यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली. (Maharashtra News)

Heramb Kulkarni, nagar news
Nitesh Rane vs Sanjay Raut : शकुनी मामा, सूर्याजी पिसाळने घराघरांत आग आणि काड्या लावणे बंद करावे; नितेश राणेंचा संजय राऊतांना टाेला

अहमदनगर शहरातील सिताराम सारडा विद्यालयात हेरंब कुलकर्णी हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेलगतच्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणार्‍या बेकायदेशिर सिगारेट, तंबाखू विक्रीच्या पानटपर्‍या हटविण्यासाठी कुलकर्णी यांनी प्रयत्न केले हाेते.

महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुराव्याने केल्याने महापालिकेने या टप-या परिसरातून हटविल्या. त्याचा राग मनात धरुन अज्ञातांनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

आज साम टीव्हीशी बाेलताना कुलकर्णी म्हणाले त्या दिवशी तिघांनी माझ्यावर लाेखंडी राॅडने हल्ला केला. माझ्यावर हाेणारा हल्ला आमचे शिक्षकमित्र सुनील कूलकर्णी यांनी राेखला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Heramb Kulkarni, nagar news
Pathardi News : ठरलं तर... पंकजा मुंडेंच्या निर्णयास आमदार माेनिका राजळेंचा पाठिंबा

नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी पाेलीसांनी ठाेस उपाययाेजना केल्या पाहिजेत. मी शाळेच्या आजूबाजूच्या पान टप-या हटविण्यासाठी प्रयत्न केले. 44 वर्षापूर्वीची टपरी देखील माझ्या पाठपूराव्याने हटली गेली असेही कूलकर्णींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Heramb Kulkarni, nagar news
Ambabai Darshan : भाविकांनाे! अंबाबाईच्या दर्शनास निघालात? थांबा, आज देवीचे दर्शन राहणार बंद, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com