Ambabai Darshan : भाविकांनाे! अंबाबाईच्या दर्शनास निघालात? थांबा, आज देवीचे दर्शन राहणार बंद, जाणून घ्या कारण

Navratri 2023 : अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.
kolhapur, Navratri 2023
kolhapur, Navratri 2023saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ambabai Mandir News : अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. या मंदिराच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंदिराचा संपूर्ण परिसर नुकताच पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच मंदिराला रंगरंगोटी देखील केली जाणार आहे. (Maharashtra News)

kolhapur, Navratri 2023
Bribe : 1 लाख 40 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या (kolhapur) करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लगबग सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मंदिर स्वच्छता व रंगरंगोटीचे काम सुरू असून काल श्री अंबाबाईच्या नित्य व उत्सवकाळातील सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

kolhapur, Navratri 2023
Shambhuraj Desai News : पाटण नगरपंचायतीस एक कोटींचा निधी, मंत्री देसाईंनी मुख्याधिका-यांना दिली महिन्याची डेडलाईन

येत्या 15 ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. देवीच्या नित्य व उत्सव काळातील चांदीच्या दागिन्यांची तर देवीच्या मौल्यवान हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवात देवीला नित्यालंकारामध्ये म्हाळुंग, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल, 16 पदरी चंद्रहार,सोन किरीट, बोरमाळ,कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसुत्र, 116 पुतळ्याची माळ, लप्पा, सात पदरी कंठी हे सर्व दागिने देवीला घालण्यात येत असतात.

kolhapur, Navratri 2023
Rahata APMC : राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'फुल खरेदी -विक्री केंद्र' उभारणार : राधाकृष्ण विखे-पाटील

दागिने तब्बल 300 वर्षापूर्वीचे असल्याने त्यांची निगा आणि स्वच्छ्ता देखील खूप काळजी पूर्वक करण्यात येत असते. या सर्व देवीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता कोणतेही केमिकल नवापरता नैसर्गिक रीत्या केली जाते. तर यावेळी देवीच्या सोन्याच्या पालखीचे ही स्वच्छ्ता करण्यात आली.

आज अंबाबाईच्या मुख्यमूर्तीचे दर्शन बंद

आज या मंदिरातील मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. यादरम्यान अंबाबाईच्या मुख्यमूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी (devotess) देवीच्या उत्सव मूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur, Navratri 2023
One Pune Metro Card Launched : 30 टक्के सवलत, जाणून घ्या महामेट्रोची 'एक पुणे विद्यार्थी पास' कार्ड याेजना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com