Nagar News : ६० रुपये एक वार,दोन वार अन् तीन वार... श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरुला उच्चांकी दर, शेतकरी आनंदित

दरम्यान टाेमॅटाेचा दर घसरल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले.
shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti
shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti saam tv
Published On

- सचिन बनसाेडे/ राेहिदास गाडगे

Shrirampur Bajar Samiti News : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याच्या पेरूला ६० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समितीत २५ ते ३० रुपये होलसेल दर मिळत असताना श्रीरामपूर येथे ६० रुपये दर मिळाल्याने शेतकरी खूप आनंदित झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra News)

shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti
Tuljabhavani Temple Development Plan : तुळजाभवानी विकास आराखड्यातील 'या' मुद्यावर वादंग, उद्या तुळजापूर बंदची हाक

श्रीरामपूर येथील प्रगतशील शेतकरी मनोजकुमार आगे यांनी पारंपरिक पिकांऐवजी सेंद्रीय पध्दतीने पेरू पिकाची लागवड केली. योग्य नियोजनामुळे पेरूच्या झाडांना आलेल्या चांगल्या दर्जाच्या आणि चविष्ट पेरूला श्रीरामपूर बाजार समितीत उच्चांकी ६० रुपये किलो होलसेल भाव मिळाला. इतर बाजार समितीपेक्षा पेरूला मिळालेला हा चांगला बाजाराभाव मानला जात आहे.

shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti
Talegaon MIDC : ...अन्यथा तळेगाव एमआयडीसी बुधवारी बंद पाडणार : आमदार सुनील शेळके

साम टीव्हीशी बाेलताना मनोजकुमार आगे म्हणाले शेतक-यांनी नगदी पिकांचा जरुर विचार करावा परंतु काही वेळेला अन्य पिकांचा, फळांचा देखील लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पेरुच्या लागवडीतून मला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

शिर्डीत पेरुला जादा मागणी आहे. किरकाेळ तसेच हाेलसेल बाजारपेठेत पेरुला चांगला दर मिळाला. शेतक-यांनी एकच लक्षात ठेवावे माल चांगला दिल्यास ग्राहक आपल्या मालाला चांगला दर देतात. खाेब-या सारखा पेरु असल्याचेही आगे यांनी नमूद केले.

shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti
Special Trains News : बाप्पा पावला! रेल्वेकडून मनमाडकरांची इच्छापूर्ती, प्रवाशांत साम टीव्हीचा बाेलबाला

टोमँटोच्या बाजारभावात मोठी घसरण

दरम्यान नारायणगाव बाजार समितीत (narayangaon bajar samiti) मागील 15 दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात घसरण सुरूच राहिली. आजच्या लिलावात 20 किलोच्या क्रेटला सरासरी 50 ते 120 रुपये असा बाजारभाव मिळाल्याने वाहतुक खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

पितृ पंधरवड्यात भाजीपालासह तरकारी मालाला चांगला बाजारभाव मिळत असताना नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने भावात घसरण झाल्याने शेतकरी पुरताच हतबल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shrirampur farmer manojkumar aage, guava , shrirampur bajar samiti
Tuljabhavani Temple Development Plan : तुळजाभवानी विकास आराखड्यातील 'या' मुद्यावर वादंग, उद्या तुळजापूर बंदची हाक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com