- अजय सोनवणे
Nashik News : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्या कालावधीत बंद करण्यात आलेली गोदावरी एक्सप्रेस अडीच वर्षानंतर पुन्हा सुरु झाली. या गाडील स्पेशल ट्रेनचा दर्जा दिल्यानंतर मनमाड-दादर असे नाव दिले गेले. ती ठराविक कालावधी पर्यंत सुरु करण्यात आली होती. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या गाडीचा कालावधी आता पुन्हा दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. तसेच धुळे-मनमाड-दादर (dhule manmad dadar train) गाडीचा कालावधी तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra News)
मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस काेरोना काळात बंद करण्यात आली हाेती. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर याच गाडीला मनमाड-मुंबई समर स्पेशल (manmad mumbai summer special train) असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी थेट धुळे (dhule) येथून सोडण्याचा घाट घातला जात हाेता. या नव्या निर्णयामुळे चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवाशांच्या भावना साम टीव्हीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पाेहचविण्यात आल्या.
आठवड्यातील सातही दिवस ही गाडी धुळे येथून सोडण्यात येऊ नये अशी मागणी प्रवाशांनी केली. प्रवाशांनी साम टीव्हीशी बाेलताना ही गाडी मनमाड येथून सकाळी साडेआठ वाजता सुटत असल्याने मनमाड, येवला, नांदगाव, मालेगाव येथील प्रवाशांना फायदा होत असताे. मनमाड ते मुंबई केवळ 110 रुपये तिकीट असल्याने प्रवाशी जास्त असतात.
मनमाड-नाशिकचे विद्यार्थी, नोकरदार हे रोज याच गाडीने जातात. त्यामुळे ही गाडी मनमाड येथून सुटावी अशी मागणी चाकरमान्यांसह प्रवाशांनी केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने ही गाडी धुळे येथून 3 दिवस व 4 दिवस मनमाड येथून साेडण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीत वाढ
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा (प्रवास) कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 02102 मनमाड - दादर विशेष 29.09.2023 पर्यंत अधिसूचित असलेली आता 04.10.2023 ते 31.12.2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 02101 दादर - मनमाड विशेष 30.09.2023 पर्यंत अधिसूचित असलेली आता 04.10.2023 ते 02.01.2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01065 दादर - धुळे विशेष 30.09.2023 पर्यंत अधिसूचित असलेली आता 06.10.2023 ते 01.01.2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01066 धुळे - दादर विशेष 30.09.2023 पर्यंत अधिसूचित असलेली आता 07.10.2023 ते 02.01.2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे रेल्वेने कळविले आहे.
आरक्षण: 02102/02101 आणि 01065/01066 विशेष ट्रेनच्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग 02.10.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या वेळा आणि थांब्यांबद्दल तपशीलवार माहितीसाठी www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in वर तपासा किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेने प्रवाशांना करीत सुविधेचा लाभ घ्यावा असे म्हटले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.