Success Story : दुग्ध व्यवसायातून प्रगती, महिन्याला साडेपाच लाखांचे उत्पन्न; वाचा साळुंबरेतील शेतकऱ्याची यशाेगाथा

शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाकडे लक्ष दिलं तर यातून नक्कीच प्रगती होऊ शकते हे मावळच्या साळुंबरे गावातील दिलीप राक्षे यांनी दाखवून दिले आहे.
maval news, dilip rakshe
maval news, dilip rakshesaam tv
Published On

Maval News : दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मावळच्या साळुंबरे गावातील शेतकरी दिलीप राक्षे यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. राक्षे हे महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळवतात. (Maharashtra News)

maval news, dilip rakshe
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ६ दिवसांची परवानगी, वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

जनावरांच्या खाद्याच्या किमती प्रचंड वाढल्याने दुग्ध व्यवसायातून फारसे उत्पन्न मिळवता येत नसल्याने मावळातील अनेक शेतकऱ्यांनी हा दुग्ध व्यवसाय कमी केला आहे. तर काहींनी पूर्णतः बंद केला याउलट दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस नसतानाही साळुंबरे येथील दिलीप राक्षे यांनी या व्यवसायावर मात करण्याचा निर्धार केला.

maval news, dilip rakshe
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

त्यांनी म्हशीसाठी आधुनिक पद्धतीने गोठा बांधला. सुरुवातीला त्यांनी दोन म्हशी विकत घेतल्या. दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे साठ म्हशी त्यातून दिवसाला तीनशे लिटर दूध मिळते. या दुधाची बाजारपेठेत विक्री केली तर दिवसाला 1900 रुपये आणि महिन्याला पाच ते साडेपाच लाख रुपये मिळतात. यातून खर्च वजा करता महिन्याला किमान दोन ते अडीच लाख रुपये त्यांना निवळ्ळ नफा मिळतो.

राज्यात अनेक असे शेतकरी आहे की ते शेतीमध्ये नुकसान झाला म्हणून शेती करणेच बंद करतात. मात्र शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाकडे लक्ष दिलं तर यातून नक्कीच प्रगती होऊ शकते हे मावळच्या साळुंबरे गावातील दिलीप राक्षे यांनी दाखवून दिले आहे.

पाम जातीचे झाडांमुळे झाला फायदा

राक्षे यांनी आधूनिक पद्धतीने म्हशीचा गोठा तयार केला. चारही बाजूने वॉल कंपाऊंड केले. त्यामध्ये पाम जातीचे झाडे लावली. या झाडामुळे गुरांना शंभर टक्के ऑक्सीजन मिळतो. त्यामुळे कुठलाही आजार, रोग म्हशींना होण्याची शक्यता नाही. गुरांना कुठलेही रोग हे ऑक्सिजन कमी मिळत असल्यामुळे होतो.

मात्र पाम झाडामुळे आतापर्यंत लंबी सारख्या रोगांनीही त्यांच्या गोठ्यात शिरकाव केला नाही. दरम्यान पाम जातीची झाडे तीनही ऋतूमध्ये हिरवी राहते आणि गोठ्यात गुरांच्या पुढे ही लावल्यामुळे म्हशींना जणू रानात फिरून चारा खाण्याचा त्यांना फिल निर्माण होतो असे राक्षे यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

maval news, dilip rakshe
Kokan Politics : इतकी घाई करू नका, इच्छा असेल तर बंधूंना भाजपात पाठवा; नितेश राणेंचा उदय सामंतांना सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com