Kokan Politics : इतकी घाई करू नका, इच्छा असेल तर बंधूंना भाजपात पाठवा; नितेश राणेंचा उदय सामंतांना सल्ला

महायुतीच्या बैठका हाेतील. त्यात प्रमुख नेते जागांबाबत चर्चा करतील असेही नितेश राणेंनी नमूद केले.
nitesh rane, uday samant
nitesh rane, uday samantsaam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून आता शिवसेना (shivsena) भाजपात (bjp) संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदय सामंत (uday samant latest marathi news) यांनी ही जागा शिवसेना लढवणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे म्हटलं. त्यावर आज आमदार नितेश राणे (nitesh rane marathi news) यांनी सामंत यांनी काेणताही दावा करु नये असे नमूद केले.  (Maharashtra News)

nitesh rane, uday samant
Kolhapur News : पत्रकारांना चहा द्या, ढाब्यावर न्या म्हणणा-या बावनकुळेंना कोल्हापूरी पायताण देणार : प्रेस क्लबचा निर्णय

सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना लढवेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट वाटपाचे अधिकार इतर कोणाला दिलेले नाहीत असे म्हटले. तसेच आपल्या वक्तव्याने युतीत तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नये असा टोलाही सामंतांनी आमदार नितेश राणेंना लगावला.

nitesh rane, uday samant
Ganeshotsav 2023 : गणेशाेत्सव काळात गाैतमी पाटीलच्या ठुमक्यांवर बंदी, पाेलीसांचा निर्णय

सामंत यांच्या या विधानानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवणार असा दावा करत धमाका उडवून दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या जागेवरून कलगीतुरा रंगल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

मोदींना खासदार देणे महत्त्वाचे आहे

उदय सामंत यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना ही जागा लढवेल असा पुनरुच्चार करत किरण सामंत हे उमेदवार असू शकतात असे म्हटले होते. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून युतीमध्ये दरी निर्माण होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान सामंत यांच्या उमेदवारीच्या वक्तव्यावर आज नितेश राणे म्हणाले जबाबदार नेत्यांनी आपापसात टीका करू नये. लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा अजून ठरलेल्या नाहीत. मोदींना खासदार देणे महत्त्वाचे आहे. उदय सामंत यांनी घाई करू नये.

आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर दबाव आहे. ही जागा कमळ चिन्हावर लढवावी. त्यांची इच्छाच असेल तर तुम्ही शिंदे साहेब (मुख्यमंत्री) यांच्या बराेबर राहा आणि तुमच्या तुमच्या बंधूंना (kiran samant) भाजपात पाठवा मग पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असेही राणेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane, uday samant
Nitesh Rane News : पत्रकारांचे कोण पाेट भरत असेल, चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काय? नितेश राणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com