Karuna Munde protesting in Nashik’s Tapovan against the proposed cutting of 35 acres of trees. Saam Tv
महाराष्ट्र

Tapovan Trees Cutting: मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा! ही लढाई कुठल्याही धर्माची नाही तर निसर्गाच्या रक्षणाची

Tapovan Tree Cutting Nashik: नाशिकच्या तपोवन परिसरातील ३५ एकरमधील झाडतोडीच्या प्रस्तावावर करुणा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

नाशिकमधील तपोवन परिसरातील तब्बल ३५ एकरमधील झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून गुरुवारी (दि.4) करुणा मुंडे यांनी प्रशासनासमोर तीव्र संताप व्यक्त केला. अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या झाडांना तोडून जमीन खासगी उद्योगपतींना देण्याची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ही झाडे केवळ हिरवळ नाहीत, हा निसर्ग आहे, आणि निसर्गाचा खून करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे तीव्र शब्दात त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला.

मुंडे म्हणाल्या, संतांनी नेहमी सांगितलं वृक्षवल्ली आमचे सोयरे वनचरे पण इथे मात्र देवा भाऊंची सोयरे अडाणी आणि अंबानी झालेत. या ३५ एकर जमिनीवरची झाडे कापून ही जमीन अडाणी-अंबानी किंवा कुणा गुजराती उद्योगपतीला देण्यासाठी सरकार धडपडत आहे. हा पापाचा ऐवज आम्ही चालू देणार नाही.

कुंभमेळ्याच्या नावाखाली, साधूसंतांसाठी सिमेंट-काँक्रीटचा हॉल उभारण्याचा विचार प्रशासन करत असल्याचा दावा मुंडे यांनी केला. त्या म्हणाल्या, बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही साधुसंतांच्या नावावर सिमेंटचे बांधकाम करण्याचा प्रयत्न करताय ते योग्य नाही. साधुसंत वनात राहतात. त्यांच्या साठी तात्पुरत्या टेंटची व्यवस्था होत असेल तर तीच योग्य. तपोवन हे साधुसंतांच्या तपस्येमुळे ओळखलं जातं. तिथल्या वृक्षांना हात घालणे म्हणजे या पवित्र भूमीचा अनादर आहे.

तुम्ही एक झाड जरी कापलं तर आमचा प्रत्येक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करेल. त्याची पूर्ण जबाबदारी देवा भाऊंचीच राहील, असा थेट इशारा त्यांनी शासनाला दिला. मुंडे पुढे म्हणाल्या, ही लढाई हिंदू धर्माची नाही किंवा कुठल्याही धर्माची नाही. ही निसर्गाच्या रक्षणाची लढाई आहे.

निसर्गाने आपल्याला घडवलं, वाढवलं. आणि आज आपणच निसर्गाला दुखावतोय. ५० वर्षे जुनी झाडे तोडण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचा खूनच. शासन खून करत आहे आणि आम्ही निसर्गासाठी बळी देण्यास तयार आहोत. वृक्ष तोडीचा प्रयत्न केल्यास तपोवनात आत्मदहन करण्याचा करुणा मुंडेंनी इशारा दिला आहे. नाशिकच्या जनतेलाही न्याय द्यावा, अशी मागणी करत मुंडेंनी प्रशासनाला तातडीने झाडतोडीचा निर्णय रद्द करण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT