Ambani Family: मुकेश अंबानी यांच्या आईंची तब्येत अचानक बिघडली; एयरलिफ्ट करून रुग्णालयात नेलं

Ambani Family: उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या घरातील प्रिय सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
Ambani Family
Ambani FamilySaam Tv
Published On

Ambani Family: उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी कोकिलाबेन अंबानी यांना विमानाने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोकिलाबेन (कोकिलाबेन अंबानी वय) या रिलायन्सचे दिवंगत संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत.

आतापर्यंत अंबानी कुटुंबाने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबाचा ताफा मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचताना दिसत आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीच्या समस्येबद्दलची अधिकृत माहिती अजून अंबानी कुटुंबाने दिली नसली तरी, त्यांच्या वृद्धापकाळामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे बोलले जात आहे.

Ambani Family
War 2 Vs Coolie: गुरुवारी 'कुली'ने मारली बाजी; 'वॉर २'ने केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री, जाणून घ्या कलेक्शन

कोकिलाबेन अंबानी यांचे वय किती

९१ वर्षीय कोकिलाबेन अंबानी या मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष) आणि अनिल अंबानी (रिलायन्स एडीए ग्रुपचे अध्यक्ष) यांच्या आई आहेत. त्या भारतातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत अंबानी कुटुंबाच्या प्रमुख आहेत. वृत्तानुसार, त्यांच्या मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल यांच्यात मतभेद वाढले. जेव्हा कौटुंबिक वाद समोर आला तेव्हा कोकिलाबेन यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. त्यांनी रिलायन्सच्या मालमत्तेचे विभाजन केले आणि कुटुंबात शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ambani Family
Anita Advani And Rajesh Khanna: 'दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा स्पर्श...'; राजेश खन्ना यांच्या आठवणीत अनिता अडवाणी नेमकं काय बोलल्या?

कोकिलाबेन अंबानी कोण आहेत?

कोकिलाबेन अंबानी या प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. अंबानी कुटुंबाच्या यशोगाथेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोकिलाबेन यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या पतीची व्यावसायिक स्वप्ने पूर्ण करण्यात त्यांना साथ दिली. त्यांनी त्यांच्या मुलांना योग्य दिशाही दिली, ज्यामुळे अंबानी कुटुंब खूप लवकर यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com