War 2 Vs Coolie: गुरुवारी 'कुली'ने मारली बाजी; 'वॉर २'ने केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री, जाणून घ्या कलेक्शन

War 2 Vs Coolie Box Office Collection: 'वॉर २' आणि 'कुली' यांच्यात सध्या थिएटरमध्ये स्पर्धा सुरू आहे. आता गुरुवारी कोणत्या चित्रपटाने दुसऱ्या चित्रपटापेक्षा चांगली कामगिरी केली ते जाणून घ्या.
Coolie vs War 2 Box Office Report
Coolie vs War 2 Box Office ReportSaam Tv
Published On

War 2 Vs Coolie: सध्या बॉक्स ऑफिसवर 'वॉर २' आणि 'कुली' यांच्यात स्पर्धा सुरू आहे. यामध्ये रजनिकांत यांचा 'कुली' हृतिकच्या 'वॉर २' ला मागे टाकत असल्याचे दिसून येत आहे. आता जाणून घेऊया गुरुवारी यापैकी कोणत्या चित्रपटांनी बाजी मारली आणि किती कलेक्शन होते.

कुली

रजनीकांत अभिनीत 'कुली' बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. आता आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, चित्रपटाने चांगले आकडे गाठले आहेत. गुरुवारी चित्रपटाने ६.२५ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. तर बुधवारी हा कलेक्शन ७.५० कोटी रुपये होता. अशाप्रकारे, आठ दिवसांत चित्रपटाने एकूण २२९.७५ कोटी रुपये कलेक्शन केले आहे.

Coolie vs War 2 Box Office Report
Bin Lagnachi Goshta: प्रेम, नातं आणि थोडीशी नोकझोक; 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये उलगडणार उमेश-प्रियाची क्यूट लव्हस्टोरी

वॉर २

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर २' च्या कमाईत सतत घट होत आहे. बुधवारी ५.७५ कोटी रुपये कमावणाऱ्या 'वॉर २' च्या कलेक्शनमध्ये गुरुवारी आणखी घट झाली. आठव्या दिवशी चित्रपटाने फक्त ५ कोटी रुपये कमावले. आठ दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०४.२५ कोटी रुपये झाले आहे.

Coolie vs War 2 Box Office Report
Face Care: ब्लॅकहेड्स काढण्यासाठी लावा घरी तयार केलेला 'हा' फेस स्क्रब, आठवड्याभरात दिसेल फरक

महावतार नरसिंह

'महावतार नरसिंह' हा अॅनिमेटेड चित्रपट अजूनही 'वॉर २' आणि 'कुली' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये तग धरुन आहे. चित्रपटाने जवळजवळ एक महिना पूर्ण केला आहे आणि अजूनही तो कोट्यवधी कमाई करत आहे. २८ व्या दिवशी, गुरुवारी, 'महावतार नरसिंह' ने १.५० कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २१८.६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com