Shruti Vilas Kadam
बेसनात कच्च्या दूधासोबत कॉफी मिसळून स्क्रब तयार करा. चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात आणि मृत त्वचा साफ होते.
मुल्तानी मातीमध्ये वाटलेली मसूर डाळ आणि मध घालून स्क्रब बनवा. याने त्वचा खोलवरून स्वच्छ होते.
दहीमध्ये टॉमेटो व लिंबाचा रस घालून तयार स्क्रब लगेच 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा, त्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करा.
दालचीनी पावडरमध्ये मध मिक्स करुन स्क्रब बनवा. चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर साफ करा.
ओट्समध्ये कच्चं दूध व मध मिसळून स्क्रब तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे स्क्रब त्वचेतील पोर्स क्लिन करते.
या सर्व स्क्रब्स सेंसिटिव्ह त्वचेसाठी वापरण्यापूर्वी पॅच-टेस्ट करणे आवश्यक आहे, म्हणजे त्वचेला कोणती रिएक्शन होणार नाही याची खात्री होईल.
योग्य वापरल्यास हे होममेड स्क्रब्स ब्लॅकहेड्स दूर करते.