Shruti Vilas Kadam
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात तर बेसन त्वचा स्वच्छ करण्यात मदत करते. एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिसळून लावा.
मध त्वचेला मॉइश्चर देतो आणि लिंबू त्वचा उजळवतो. दोन्ही मिसळून चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा.
केशर त्वचा उजळवते तर दूध नैसर्गिक क्लिन्झर आहे. थोडं केशर रात्री दूधात भिजवून सकाळी चेहऱ्यावर लावा.
दही त्वचेला थंडावा देते आणि मृत पेशी काढून टाकते. यामध्ये मध घालून लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते.
ओट्स त्वचेचा स्क्रब म्हणून काम करतो आणि टोमॅटो नैसर्गिक टोनर आहे. हे दोन्ही एकत्र करून लावा.
पपईत असलेले एंजाइम्स त्वचेतील डेड स्किन काढतात. त्यात मध मिसळून लावल्याने त्वचा उजळते.
आलोवेरा त्वचेला थंडावा आणि आर्द्रता देतो. गुलाबपाणी टोनिंगसाठी फायदेशीर आहे. दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर लावा.