Karanataka Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

Husband Killed Wife In karnataka: कर्नाटकमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या बारामतीच्या महिलेची तिच्याच नवऱ्याने निर्घृण हत्या केली. आरोपीने आधी मारहाण करत बायकोचा गळा चिरला. त्यानंतर त्याने कारच्या चाकाखाली बायकोला चिरडलं.

Priya More

Summary:

  • कर्नाटकमध्ये बारामतीतील महिलेची हत्या

  • नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून केली हत्या

  • धारदार शस्त्राने गळा चिरला त्यानंतर कारखाली चिरडलं

कर्नाटकमध्ये एका तरुणाने बायकोची निर्घृण हत्या केली. हे दाम्पत्य मूळचे पुणे जिल्ह्यातल्या बारामतीचे असून ते कर्नाटकमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. या तरुणाने बायकोला बेदम मारहाण करत तिचा गळा चिरला त्यानंतर कारखाली चिरडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कर्नाटक प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शैला (२८ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. तर अक्षय असं आरोपीचे नाव आहे. शैला आणि अक्षय देवदर्शनासाठी कर्नाटकातल्या कलबुर्गा जिल्ह्यातील गाणगापूरला गेले होते. गाणगापूरला जाताना दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या अक्षयने रस्त्याच्या कडेला कार उभी केली आणि बायकोला बाहेर खेचत तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षयने शैलाला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने शैलाचा गळा चिरला. ऐवढ्यावर न थांबता अक्षयने संतापाच्या भरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाच्या अंगावरून कार नेत तिला चाकाखाली चिरडलं.

रस्त्यावरून जाणारे नागरिक या घटनेला पाहत राहिले आणि मोबाइलमध्ये ते व्हिडीओ बनवत राहिले. शैला मदतीसाठी विनवनी करत होती पण कुणी तिला वाचवायला गेले नाही. काही नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यानंतरही आरोपी अक्षय शांत झाला नाही. बायकोला संपवल्यानंतरच तो शांत झाला.

अक्षय आणि शैलाचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे अक्षयने हे भयंकर कृत्य केले. अक्षयने पूर्वनियजित कट रचत शैलाची हत्या केली. त्याने देवदर्शनाच्या नावाखील शैलाला फूस लावत कर्नाटकात नेले आणि त्याठिकाणी तिची हत्या केली. या घटनेनंतर कलबुर्गी पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT