Crime News: धक्कादायक! शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी; ट्रस्टीच्या पोरानं मर्यादा ओलांडल्या, अश्लील व्हिडिओ पाठवला, नंतर...

Dombivli Crime: डोंबिवलीतून छेडछाडीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाने एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवला. त्यानंतर शिक्षिकेकडे शारीरिक संबंधांसाठी दबाव आणला.
Dombivli Crime:
Police and locals gather at a Dombivli school after shocking harassment allegations against trustee’s son.
Published On
Summary
  • डोंबिवलीत शिक्षिकेच्या छळाचा धक्कादायक प्रकार

  • ट्रस्टच्या मुलावर अश्लील मेसेज व दबावाचा आरोप

  • मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांची तातडीची कारवाई

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीत एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ट्रस्टच्या मुलगा एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवत शारीरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. याप्रकणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन प्रचंड गोंधळ घातला. यानंतर मानपाडा पोलीस शाळेत दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Dombivli Crime:
मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार

नराधमाला आमच्या ताब्यात द्या, अशी जोरदार मागणी केली. अखेर मानपाडा पोलीस शाळेत दाखल झाले. पोलिसांनी ट्रस्टचा मुलाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने सहावीच्या मुलीसोबत असा प्रकार केला असल्याचं पीडित शिक्षिकेने सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी शाळेच्या ट्रस्टीने सांगितले की, माझ्या मुलाने असा प्रकार केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.

डोंबिवली सागांव परिसरात ही शाळा आहे. या शाळेच्या ट्रस्टीच्या मुलावर शाळेतील शिक्षिकेने गंभीर आरोप केला आहे. शिक्षिकेच्या मुलीला त्याने अश्लील मेसेज पाठवला होता. अश्लील व्हिडिओ पाठवून त्याने शरीर संबंध ठेवण्याची, मागणी केली. असा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेसह मुलीच्या आईने मनसेकडे तक्रार केली. हा प्रकार कळताच मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे, मनसेच्या महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी थेट शाळेत धाव घेतली.

Dombivli Crime:
Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

शाळेत शाळेचे ट्रस्टी आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. मुलाला कुठे लवपून ठेवलं आहे. त्याला आमच्या दाब्यात द्या, अन्यथा मनसे स्टाईलने त्याला शिक्षा देऊ, असं पदाधिकारी म्हणाले. जवळपास एक तास शाळेत मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. अखेरी हा प्रकार कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी स्वत: मनसे पदाधिकाऱ्यांना शाळेतून बाहेर काढलं त्यानंतर ट्रस्टी यांच्याकडे त्यांच्या मुलाविषयी विचारणा केली.

त्यावेळी पोलिसांनी शाळेच्या शेजारी असलेल्या घरातून त्या मुलाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात पिडीत शिक्षिका, तिची आई, मनसे पदाधिकारी पोहचले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com