मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार

Mumbai Crime: मुंबईतील मुलुंड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार
Published On
Summary
  • मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला

  • बोलणं बंद केल्याच्या रागातून आरोपीचा हल्ला

  • आरोपी आशिष बनसोडला पोलिसांकडून अटक

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुलुंड परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण मुबंई शहर हादरलं आहे. बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने 16 वर्षीय मुलीवर आणि तिच्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. आशिष बनसोड असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडिता आणि आरोपी हे बदलापूरचे रहिवासी असून एकमेकांना ओळखतात.

मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार
Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं. याचा राग मनात धरत आरोपीने मुलुंडमध्ये तरुणीला कॉलेजजवळ तिला गाठलं आणि कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला.

मुंबई हादरली! बोलणं बंद केल्यानं तरुणाचं डोकं सटकलं;16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार
Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

तिच्यासोबत असलेल्या मित्रावरही तरुणाने हल्ला केला. दरम्यान हल्ल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसानी आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. आरोपी आशिषवर बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास मुलुंड पोलीस करीत आहेत. घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com