अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा अनेकदा उघडकीस आला आहे. यामुळे काही रुग्णांना आपले प्राण देखील गमावले लागले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली असता याठिकाणी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची बेफिकीरी पाहण्यास मिळाली आहे. यावरून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तात्काळ कारवाई करत सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच आरोग्य विभागात शिस्त आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तरीही रुग्णालयाच्या कारभारात काही सुधारणा झाली नसल्याचे समोर आले आहे.
तिन्ही रुग्णालयांना अचानक भेट
गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी कल्याण व डोंबिवलीतील तिन्ही प्रमुख रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर आणि वसंत व्हॅली या रुग्णालयांची अचानक पाहणी केली. साध्या वेशात रुग्णालयात दाखल होत त्यांनी प्रत्यक्ष रुग्ण कक्षात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. तर रात्रपाळीत एकही कायमस्वरूपी कर्मचारी उपस्थित नसून सर्व कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवरील होते. आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णय घेण्यास अशा कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. हे माहीत असूनही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
अपघात विभागात उपस्थित असणं अपेक्षित असलेले डॉक्टर अनुपस्थित होते. याशिवाय, रुग्णालयात एका कर्मचार्याने अर्ध्या कपड्यावर रात्रपाळी केली; हेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. महिला रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब लक्षात घेत या सगळ्यावर तात्काळ कारवाई करत रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉ. शोभना लावणकर, शास्त्रीनगर रुग्णालयाचे डॉ. योगेश चौधरी आणि वसंत व्हॅली रुग्णालयाच्या डॉ. सपना रामोळे या तिन्ही रुग्णालयांतील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावत. ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.