पराग ढोबळे
नागपूर/ गडचिरोली : सहा राज्यात मोस्ट वांटेड असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात आंध्रप्रदेश पोलिसांना यश आले आहे. तसेच या चकमकीत चलपतीच्या पत्नीला देखील कंठस्नान देण्यात आले आहे. नक्षल नेत्याला पकडून देणाऱ्याला सहा राज्यांमधूल तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्लीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यावरून १८ जूनला विशेष नक्षलविरोधी पथक ग्रेहाउंड्सच्या जवानांनी या परिसरात शोधमोहीम राबवली होती. दरम्यान, पहाटे सहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसाच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनी देखील प्रतिहल्ला करत गोळीबार करण्यास सुरवात केली.
चकमकीत तिघे ठार
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात केंद्रीय समिती सदस्य गजर्ला रवि उर्फ उदय हा ठार झाला आहे. तसेच चकमकीत रविसह नक्षल नेता चलपती याची पत्नी रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि प्लाटून सदस्य अंजु या दोघींचाही खात्मा करण्यात आला आहे. मारडपल्ली जंगलात ही चकमक झाली. दरम्यान गजर्ला रवी ऊर्फ उदय हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याचा खात्मा झाल्याने नक्षलवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे.
सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटींचे होते बक्षीस
मूळचा तेलंगणातील रहिवासी असलेल्या रवी याच्यावर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. रवी नक्षलवाद्यांच्या आंध्रा- ओरिसा बॉर्डर समितीचा सचिव तसेच आंध्र प्रदेश स्पेशल झोनल समितीचा सदस्य म्हणूनही कार्यरत होता. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये त्याचा मोठा प्रभाव होता. त्याच्यासोबत अरुणालाही जवानांनी ठार केले. ती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य चलपती याची पत्नी होती. तसेच, ती वरिष्ठ नक्षलवादी नेता चेरकुरी राजकुमार ऊर्फ आझादची बहीण होती. तिच्यावरही ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.