Onion Price : कांदा भाववाढीची प्रतीक्षा; चाळीत साठवणूक केलेला कांदा लागला सडू

Dhule News : यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी दर नसल्यामुळे कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला. थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरिपासाठी खर्च करता येईल; अशी त्यांची अपेक्षा होती
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

धुळे : मागील महिन्यात ऐन कांडा काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा शेतातच सडला होता. यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची चाळीत साठवणूक केली होती. मात्र आता भाव वाढीच्या प्रतीक्षेत चाळीतील कांदा देखील सडू लागला आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

धुळे तालुक्यातील आर्णी गावासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता. गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरिपासाठी खर्च करता येईल; अशी त्यांची अपेक्षा होती. पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळींमध्येच सडू लागला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होताना दिसून येत आहे.

Onion Price
Crime News : संस्था अध्यक्षांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर; दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

अवकाळीतही झाले नुकसान 

दरम्यान संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून शेतात ठेवला होता. तर काहींची काढणी करणे बाकी होते. मात्र अवकाळी पावसात सापडलेला कांदा शेतातच सडला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. थोडाफार चांगला राहिलेला कांदा चाळीत ठेवला होता. मात्र हा कांदा देखील आता सडू लागला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

Onion Price
Buldhana : अन्नत्याग आंदोलन चिघळले; १२ महिलांची तब्ब्येत खालावल्याने रुग्णालयात भरती, प्रशासनाचे दुर्लक्ष

शेतकरी अडचणीत 

धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. काहींनी तर भाडेतत्त्वावर चाळ घेऊन कांद्याचा साठा केला आहे. मात्र सतत बदलत असलेल्या हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा आता सडू लागल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com