बुलढाणा : लोणार तालुक्यातील वेणी गावातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीवर झालेल्या कथित अतिक्रमण विरोधात आवाज उठवत वेणी येथील २३ महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ११ जूनपासून सुरु असलेल्या या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. दरम्यान आंदोलनातील १२ महिलांची तब्बेत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावात गट क्रमांक १९५ मधील संबंधित जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे. मात्र गेल्या २० वर्षांपासून ती जागा त्यांच्याच ताब्यात आहे. या ठिकाणी कंपाउंड वॉल बांधण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या नोंद वहीत जागेची ८ अ नोंद अस्तित्त्वात आहे; असा दावा आंदोलकांनी निवेदनातून केला आहे. दरम्यान, ही जागा गावांतील लोकप्रतिनिधींकडून बळकावण्याचा प्रयत्न होत असून पोलिस संरक्षणात जागा हडपल्या जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१२ महिलांची तब्बेत खालावली
परिणामी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेत कोणताही बदल करू नये, अशी मागणी या महिलांनी केली आहे. दरम्यान स्मशानभूमीवर करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधात महिलांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. ११ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असून आज आंदोलनातील १२ महिलांची तब्बेत खालावली आहे. यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जलसमाधी आंदोलनाचा इशारा
यानंतर उपोषणकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. वेणी येथील स्मशानभूमी जागेवरील अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलानी घेतली आहे. तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास येळगाव येथील धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावातील महिला व पुरुषांनी दिला आहे. यासाठी १८ जूनची या महिलांनी मुदत दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.