Crime News : संस्था अध्यक्षांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर; दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Shahapur News : ट्रस्टचे माजी कर्मचारी किशोर जोंधळे यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी संस्थेतून राजीनामा दिला. यानंतर ट्रस्टची कागदपत्रे व डिजिटल स्वाक्षरी, पेनड्राईव्ह अधिकृत ट्रस्टींना न देता स्वतःकडेच ठेवले
Shahapur News
Shahapur News Saam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: विघ्नहर्ता ट्रस्ट आसनगाव या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष डॉ. शिवाजीराव सखाराम जोंधळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून इनकम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर अनधिकृत बदल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी संस्थेच्या उपाध्यक्षा गीता खरे यांनी शाहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष डॉ. शिवाजीराबा जोंधळे यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करण्यात आला आहे. या बाबतच्या तक्रारीनुसार ट्रस्टचे माजी कर्मचारी किशोर भाऊसाहेब जोंधळे (रा. डोंबिवली) यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी संस्थेतून राजीनामा दिला होता. यानंतर देखील ट्रस्टची कागदपत्रे व डिजिटल स्वाक्षरी, संबंधित पेनड्राईव्ह अधिकृत ट्रस्टींना न देता स्वतःकडेच ठेवले होते. या माध्यमातून त्यांनी गैरवापर केला आहे. 

Shahapur News
Karjat news : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही आदिवासींची परवड थांबेना; आरोग्य सेवेचा बोजबारा, झोळीतून रुग्णाचा खडतर प्रवास

आयकर विभागाच्या संकेतस्थळावर केले लॉगिन 

दरम्यान किशोर जोंधळे याने माजी सदस्य तात्याबा मुरलीधर शेपाळ ज्यांनी २०२० मध्ये ट्रस्टमधून राजीनामा दिला होता. यांच्यासोबत संगनमत करून १ एप्रिल २०२५ ला आयकर विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन केले. या लॉगइनद्वारे त्यांनी संस्थेच्या अधिकृत Key Person च्या नावात बदल करून सध्याच्या सेक्रेटरी स्नेहा माने यांच्याऐवजी तात्याबा शेपाळ यांचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अपडेट केला. याशिवाय, डिजिटल स्वाक्षरी विभागात किशोर जोंधळे यांचा ईमेल आणि मोबाईल नमूद केला.

Shahapur News
Nagpur : सहा राज्यात मोस्ट वॉन्टेड नक्षल नेत्याचा खात्मा; तीन कोटी रुपयांचे होते बक्षीस, चलपतीच्या पत्नीलाही कंठस्नान

शहापूर पोलिसात गुन्हा दाखल 

सदरची बाब लक्षात आल्यानंतर गीता खरे आणि स्नेहा माने यांनी तत्काळ आयकर विभागाशी संपर्क साधून नव्याने पासवर्ड रिसेट करून अधिकृत माहिती सादर केली. या प्रकार करत फसवणुकीप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींविरोधात लवकरच कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com