Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News : नवरीचे दागिने पाहून नियत फिरली; साखरपुड्यातच ब्युटीशीयन महिलांनी लांबविले दागिने 

नवरीचे दागिने पाहून नियत फिरली; साखरपुड्यातच ब्युटीशीयन महिलांनी लांबविले दागिने 

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु असताना नवरीच्या दागिने चोरणाऱ्या दोन ब्यूटीशियन तरुणींना रामनगर पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्यात. कार्यक्रमा दरम्यान नवरीचे दागिने पाहून या दोघींची नियत फिरली आणि त्यांनी दागिने (Kalyan) चोरले. मात्र सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने हा दोघी ब्यूटीशियन तरुणींचा भांडाफोड झाला. कल्पना राठोड आणि अंकिता परब असे चोरट्या महिलांची नावे आहेत. (Tajya Batmya)

मुलुंड येथे राहणाऱ्या पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा १५ ऑगस्टला डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील सोनल हॉलमध्ये साखरपुडा होता. साखरपुडा कार्यक्रमासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमात नवरदेव, पाहूणे व्यस्त असताना हॉलमधील ज्या रुममध्ये नवरीचे साहित्य ठेवण्यात आले होते, त्याठिकाणी कोणी नव्हते. याच वेळी पूजा गुप्ताचा मेकअप करणारी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोघी रुममध्ये आल्या. पूजा गुप्ताची पर्स पाहून दोघींची (Crime News) नियत फिरली. कल्पना हिने पर्समधील दागिने काढून घेतले. तर अंकिता हिने पर्समधील रोकड चोरली. कार्यक्रमानंतर त्या दोघी निघून गेल्या. 

आपले दागिने हरविल्याचे पूजाच्या लक्षात येताच या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, प्रशांत सरनाईक, विशाल वाघ,देविदास पोटे, आशा सुर्यूवंशी यांच्या पथकाने तपास सुरु केला. हॉलमधील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. सीसीटीव्हीत कल्पना आणि अंकिता या दोघी पूजाच्या रुममध्ये ये जा करीत असल्याचे दिसून आले. या दोघींना ताब्यात घेऊन पोलिस तपास सुरु केला. आधी या दोघीनी उडवा उडवीची उत्तर दिले. मात्र नंतर त्यांनी कबूली दिली. दागिने पाहून नियत फिरल्याने दागिने आणि रोकड चोरी केले असे सांगितले. या पैकी कल्पना ही मालाड येथे राहणारी असून अंकिता ही नालासोपारा येथे राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT