Parbhani News: कांदा निर्यात शुल्कात वाढ; केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

Parbhani News कांदा निर्यात शुल्कात वाढ; केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
Parbhani News Onion Price
Parbhani News Onion PriceSaam tv
Published On

परभणी : कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. (Farmer) केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा परभणीत (Parbhani) स्वाभिमानी शेतकरी घटनेने निषेध करत केंद्र सेकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. हा निर्णय मागेघेण्याची मागणी केली आहे. (LIve Marathi news)

Parbhani News Onion Price
Jalna News: बदली रद्द करुन अभियंता आल्याने गुत्तेदार, कार्यकर्त्याकडून जल्लोष; डीजे लावून काढली मिरवणूक

एकीकडे शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्याचे औदार्य शासन दाखवू शकले नाही. दुसरीकडे राज्य आत्महत्याग्रस्त बनत चालले आहे. अशावेळी कांद्याला जेमतेम २५०० पर्यंत भाव मिळू लागता. केंद्र शासनाने ग्राहक धार्जीनी धोरण घेऊन कांदा उत्पादकांना आत्महत्येच्या खाईत लोटण्याचा जणू निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शासनाने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवत कांदा उत्पादकांच्या कष्टाची लक्तरे काढली आहेत. 

Parbhani News Onion Price
Kanbai Utsav: खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन

एकीकडे कांदा महाग झाला की, पाकिस्तान सारख्या देशाकडून स्वस्त कांदा देशात आणून स्थानिक कांद्याचे भाव पाडायचे; हे देशाने पाहिलेलेच आहे. कांद्याला थोडासा चांगला भाव मिळू लागताच केंद्र सरकारने असा निर्णय घेणे म्हणजे नेहमीप्रमाणे शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण हेच सिद्ध झाले आहे. वरील संतापी निर्णय शासनाने घेतल्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत, सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com