Jalna News: बदली रद्द करुन अभियंता आल्याने गुत्तेदार, कार्यकर्त्याकडून जल्लोष; डीजे लावून काढली मिरवणूक

Jalna News बदली रद्द करुन अभियंता आल्याने गुत्तेदार, कार्यकर्त्याकडून जल्लोष; डीजे लावून काढली मिरवणूक
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : महावितरण अभियांत्यांनी वरिष्ठाना हाताशी धरून ही बदली महिनाभरातच बदली रद्द करुन पुन्हा जालना झोनच्या त्याचं डिव्हिजन ३ मध्ये करुन घेतली. त्यांची बदली होताच या डिव्हिजनमध्ये (Jalna) काम करणाऱ्या गुत्तेदारांनी या अभियांत्याची चक्क डीजे लावून गुलाल उधळून जंगी स्वागत करत तब्बल दीड किमी (Mahavitaran) मिरवणूक काढून ठेका धरला आहे. तर काहींनी सोशल मीडियावर "मैदान-ए-जंग में खौफ छा रहा है लगता है जंगल में शेर वापस आ रहा " स्टेटस ही ठेवल्याने शहरात विविध चर्चाना उधाण आलं आहे. (Breaking Marathi News)

Jalna News
Pimpri Chinchwad News: रुग्णालयातच जादूटोणासारखे मंत्रोपचार करून उपचार; व्हिडीओ झाला व्हायरल

जालन्यातील महावितरणच्या अभियांत्याच्या तक्रारीनंतर रत्नागिरी झोनमध्ये महिना दीड महिन्यापूर्वी बदली झाली होती. परंतु महिनाभरातच हि बदली रद्द करून आणली. महावितरणच्या अभियांत्यांनी आपली बद्दली रद्द करुन दाखवल्याने तक्रादार सर्व सामान्य लोकांनाच्या जिद्दीवर ही मिरवणूक काढण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. तक्रारी वरून बदली झालेल्या अभियांत्याची पुन्हा त्याचं जागी बदली आणि त्यात त्याच्या रद्द झालेल्या बदलीचा जल्लोष पाहता महावितरणमध्ये चाललं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Jalna News
Kalyan News: किती हप्ता पाहिजे ते सांगा, आम्ही लोक वर्गणीतून देतो; पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

डीजेवर बंदी असतांना विना परवानगी मिरवणूक 

जिल्ह्यात डीजेवर बंदी असताना कुठली ही परवानगी न घेता डीजे लावून रद्द बदलीचा जल्लोष साजरा केला आहे. अभियंताची ही मिरवणूक मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे काढल्याने शहरात या अभियांत्याच्या नावाच्या चर्चाना उधाण आलं आहे. तब्बल दोन तासापासून ही मिरवणूक सुरु असल्याने शहरात यांना मिरवणूक काढण्याची परवानगी दिली कुणी अशा चर्चाना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com