Kanbai Utsav: खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन

Nandurbar News खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन
Kanbai Utsav Nandurbar News
Kanbai Utsav Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
: सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात साजरा केला जात असतो. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात. त्याचप्रमाणे खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य घराकडे न चुकता येतात. अवघ्या दीड दिवसांचा हा सण  खानदेशातील प्रत्येक कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो. एक दिवसाचे पाहुनी आलेल्या कानुबाई मातेला आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत निरोप देण्यात आला. खानदेशातील कष्टकऱ्यांची कुलदैवत असलेल्या कानबाई मातेला शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले आहे. (Latest Marathi News)

Kanbai Utsav Nandurbar News
Kalyan News: किती हप्ता पाहिजे ते सांगा, आम्ही लोक वर्गणीतून देतो; पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

खानदेशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे. अत्यत लोभस आणि साधं असं हे दैवत आहे. या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिर आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी मातेची स्थापना करतात. कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते; तिथे फुलमाळानी सजवून छोटासा गाभारा आणि मंडप तयार केला जातो. तांब्यावर नारळ ठेवलं जात त्या नारळाला नथ, डोळे लावून कानबाई मातेचे रूप दिले जाते. त्याला अलंकारांनी सजवले जाते. मातेचं हे रूप लोभस आणि देखणं राहत. आपलंस वाटणार कानबाई मातेचे हे रूप पाहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आवर्जून उपस्थति राहतो. 

Kanbai Utsav Nandurbar News
Jalna News: बदली रद्द करुन अभियंता आल्याने गुत्तेदार, कार्यकर्त्याकडून जल्लोष; डीजे लावून काढली मिरवणूक

कानुबाईला निरोप 

१०७ प्रकारच्या वनस्पतीं आणि सात नद्यांचे पाणी आणून कानबाईचे पूजा सजवली जाते. रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी मोठ्या उत्साहात पारंपारिक खानदेशी नृत्य फुगडी खेळत निरोप देण्यात आला. श्रावण सरींच्या हजेरीने दरवर्षी कानबाई मातेला निरोप दिला जातो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वांची नजर पावसाकडे लागू नये आणि खानदेशातील कष्टकरी शेतकऱ्याने आता कानबाई मातेला पावसासाठी साकडे घातले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com