kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कोर्टातून बाहेर येताच आरोपीने ठोकली धूम; दोन पोलिसांच्या ताब्यातून पसार, आठ तासात पुन्हा पोलिसांनी घेतले ताब्यात

kalyan News : टिटवाळा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सुनावणीसाठी त्याला कोठडी संपल्याने टिटवाळा पोलिसांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: पॉक्सो कायद्यानुसार बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात टिटवाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेला आरोपी शुक्रवारी सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातुन पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र गर्दीचा फायदा घेत त्याने धूम ठोकली. मात्र पोलिसांनी फरार झालेल्या या आरोपीला आठ तासाच्या आत रायगडच्या रोहा येथून ताब्यात घेतले आहे. 

चैतन्य शिंदे याच्यावर टिटवाळा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सुनावणीसाठी त्याला कोठडी संपल्याने टिटवाळा पोलिसांनी शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला आधारवाडी कारागृहात नेण्यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या बाहेर वाहनात बसवून पोलीस स्टेशनला नेण्यासाठी आणले.  

हाताला झटका देत झाला पसार 

दरम्यान पोलिसांनी त्याला बेड्या घालण्याचा प्रयत्न करत असताना चैतन्यने अचानक दोघा पोलीस अधिकाऱ्यांना जोरदार झटका दिला. गर्दीचा फायदा घेत कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने धूम ठोकली. या दरम्यान पोलिसांनी त्याचा फाटला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गर्दीचा फायदा घेत पसार झाला. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून परिसरात शोधमोहीम सुरू केली.

सीसीटीव्ही तपासात रोहा येथून घेतले ताब्यात 
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींचा तपास करत पोलिसांनी चैतन्यचा शोध सुरू केला. चैतन्य रायगड येथील रोहा येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत रायगड जिल्ह्यातील रोहा येथून चैतन्य शिंदे याला अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

SCROLL FOR NEXT