Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

Pandharpur : टोकन दर्शन प्रणालीची १५ जूनला पहिली चाचणी; आषाढीच्या टोकन दर्शनाची तयारी सुरू

Pandharpur News : पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे भाविकांच्या मोठ्या दर्शन रांगा लागत असतात. यात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी तासंतास दर्शन रांगेत उभे राहावे लागत असते
Published on

पंढरपूर : भाविकांना विठुरायाचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे; यासाठी विठ्ठल मंदिर समितीने टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली येत्या १५ जून पासून सुरू करण्यात येणार आहे. टोकन दर्शन सुविधेची मंदिरात आता तयारी सुरू झाली आहे. अर्थात आषाढीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणाऱ्या गर्दीत हि सुविधा भाविकांसाठीच सोयीची ठरणार आहे. 

पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आषाढी, कार्तिकी एकादशीला अधिक प्रमाणात गर्दी असते. यामुळे भाविकांच्या मोठ्या दर्शन रांगा लागत असतात. यात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी तासंतास दर्शन रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र भाविकांना सोयीचे व्हावे, तसेच लवकर दर्शन घेता यावे; यासाठी विठ्ठल मंदिर समितीने तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याची टेस्टिंग करण्यात येत आहे. 

Pandharpur News
Palghar Crime : जमिनीच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; पाच महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर ताब्यात

चाचणी यशस्वी झाल्यास प्रणाली सुरु 

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी हि सुविधा आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात येत आहे. आषाढी यात्रेपासून हि सुविधा कायमस्वरूपी सुरु होणार असून प्रायोगिक तत्वावर याची चाचणी करण्यात आली आहे. मात्र टोकन दर्शनाची पहिली चाचणी १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाली तर ही प्रणाली पुढे सुरू ठेवली जाईल; असं ही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.

Pandharpur News
Jalgaon : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला; कुटुंबीयांचा आक्रोश

भाविकांचा वाचणार वेळ 

मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटसह पंढरपुरातील रेल्वे, बसस्थानकासह मंदिर परिसरात टोकन नोंदणी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. टोकन दर्शन सुविधेमुळे भाविकांना दिलेल्या वेळेत दर्शन घेता येणार आहे. या सुविधेमुळे व्हीआयपी दर्शनाला चाप बसणार आहे. शिवाय भाविकांना तासन् तास दर्शन रांगेत उभे राहण्याचा त्रास देखील कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com