Jalgaon : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला; कुटुंबीयांचा आक्रोश

Jalgaon News : शहरातील तांबापुरा रामनगर भागातील नदीम शेख गनी (वय २४) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रामनगर परिसरातील ५ ते ६ तरुणांनी ईदनिमित्त सुट्टी असल्याने दुपारच्या वेळी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मेहरुण तलावात पाच ते सहा तरुण मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडाल्याने बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. 

जळगाव शहरातील तांबापुरा रामनगर भागातील नदीम शेख गनी (वय २४) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रामनगर परिसरातील ५ ते ६ तरुणांनी ईदनिमित्त सुट्टी असल्याने दुपारच्या वेळी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यात नदीम शेख गनी (वय २४) यांच्याकडे ईदसाठी आलेला पाहुणा अजहर खान नबी खान (वय २५), नदिमचा मामे भाऊ इरफान शेख, अजहरचा मामे भाऊ तोहिद खान रईस खान आणि मोसीन शेख दुपारी मेहरुण तलावावर गेले. 

Jalgaon News
Jalna : जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा; घरावरील पत्रे उडाले, शेतकऱ्याचा संसार उघड्यावर

थकवा आल्याने काठापर्यंत पोहचू शकला नाही 

तलावावरील गणेश घाटाच्या समोरील बाजूने काठावर सर्व तरुण पोहत होते. दरम्यान नदीम आणि अजहर यांना चांगले पोहता येत असल्याने ते तलावाच्या मध्यभागापर्यंत पोहत गेले. बराच वेळ पोहल्यानंतर अजहरसह इतर मित्र काठावर पोहोचले. मात्र, नदीम हा पोहचू शकला नाही. तो २० ते २५ फूट अंतरावर असताना थकल्याने बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि तलावात नदीमला वाचविण्यात गेलेल्या अजहरने सांगितले.

Jalgaon News
Palghar Crime : जमिनीच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; पाच महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर ताब्यात

नदीम बुडाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच परिसरातील नागरिक, तरूणांनी तलावावर गर्दी केली. यानंतर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले. यानंतर पोलिसांनी मेहरुण- तांबापुरा, रामेश्वर कॉलनीतील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. सायंकाळपर्यंत शोध घेतला असता तरुणाचा शोध लागला नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. तर आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com