kalyan crime news saam tv
महाराष्ट्र

Daddy आणि त्यांच्या Girlfriend च्या भानगडीचा आईला त्रास, मुलीची पाेलिसांत तक्रार

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan News : पती आणि त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केली अशी तक्रार मुलीने कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर मुलीच्या वडिलांसमेवत त्याच्या प्रेयसी विरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

इंजिनिअर महिलेच्या आत्महत्येमुळे पाेलिस देखील चक्रावले हाेते. या घटनेचा तपास करताना पाेलिसांसमाेर एक धक्कादायक माहिती आली. पाेलिसांनी सांगितल्यानूसार प्रज्ञा मोरे या बदलापूर येथे राहत हाेत्या. त्या इंजिनिअर हाेत्या त्यांचे पती सचिन मोरे यांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध हाेते. याची कल्पना माहिती प्रज्ञा यांना होती. परंतु त्यांचा या प्रेमसंबंधांना विरोध होता.

पती संजय यांनी संबंधित महिलेशी संबंध ठेवणार नाही असे प्रज्ञाला सांगितले होते. मात्र पती पुन्हा त्या महिलेचा संपर्कात होता. महिलेला सोडू शकत नाही. तुला काय करायचे ते कर असे बोलून तिच्यासोबत भांडण उकरुन काढत होता.

संबंधित महिला देखील प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक त्रासाला कंटाळली होती. प्रज्ञा ही १३ एप्रिल रोजी बदलापूरहून कामावर जाण्यासाठी निघाली.

ती कल्याणला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर आली असता ती भर रस्त्यात कोसळली. तिला नागरीकांनी उचलून एका रुग्णलायात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना दोन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला.

दरम्यान पती आणि त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केली अशी तक्रार प्रज्ञाची कन्या रिद्धी हिने (kalyan) बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानंर पाेलिसांनी प्रज्ञाचे पती संजय आणि त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Fatty liver: आता घरबसल्या तुम्हाला समजेल फॅटी लिव्हरचा त्रास; तज्ज्ञांनी सांगितले शरीरात होणारे ५ मोठे बदल

Kalyan : उमेदवारीसाठी काही पण! १० दिवसात २ वेळा झेंडा बदलला, शिवसेनेत तिकिट मिळेना म्हणून तुतारी हातात

Dhurandhar: 'जे पाकिस्तान करू शकले नाही...'; रेहमान डकैतच्या या मित्राने धुरंधरसाठी केलं भारताचं कौतुक

Paneer Tikka Recipe: 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT