Love Marriage नंतर दाेघेही हाेते आनंदित... अन् तिचे दुस-याशी सूत जुळले; मग काय Boyfriend च्या मदतीने पतीलाच संपवलं

मनुकुमार याच्या मित्राचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Kasara Crime News, Love
Kasara Crime News, Love saam tv

- फय्याज शेख

Kasara Crime News : नवीन कसारा घाटात गणपती मंदिरानजीक आढळलेल्या युवकाच्या मृतदेहाप्रकरणी पाेलिसांनी एका महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पाेलिसांनी तब्बल 20 दिवस कसून तपास केला असून आणखी एकाचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Kasara Crime News, Love
Ajit Pawar यांना चिमटा... व्यंगचित्र पुर्ण हाेताच Raj Thackeray म्हणाले, पुढं काय लिहू गप्प बसा (पाहा व्हिडिओ)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार काही वर्षांपासून जुन्नर भागात लव्ह मॅरेज केलेले सुशील कोथेरे आणि त्याची पत्नी कोमल हे गुण्या गोविंदाने राहत होते. त्यांचा सुखी संसार सुरु होता. त्यांना दोन लहान मुले देखील आहे. या दाम्पत्यापैकी एकाचे नातेवाईक कल्याण (kalyan) परिसरात राहायला होते. त्यामुळे हे दाम्पत्य कायम कल्याणकडे नातेवाईकांकडे ये जा करीत असतं.

Kasara Crime News, Love
Nitesh Rane On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरुन नितेश राणेंची High Voltage घाेषणा

एक वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली परिसरात भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मनुकुमार त्रिलोकनाथ खरवार (वय 28) याच्या समवेत कोमलचे सूत जुळले. या दाेघांच्या प्रेम प्रकरणाचा अंदाज काेमलचा पती सुशील यांना आला. काही वेळा त्यावरुन दाेघांत खटके उडू लागले.

मनुकुमार व कोमल यांच्यात सुशील अडथळा ठरु लागल्याने त्यांना त्याचा काटा काढण्याचे ठरवलं. दरम्यान 13 एप्रिल दरम्यान काेम आणि सुशिल यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तेथे मनुकुमार देखील आला.

Kasara Crime News, Love
Vinayak Raut On Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यात काळी मांजरं आडवी टाकण्याचा भाजपचा प्रयत्न, विनायक राऊतांनी नारायण राणेंना 'झंझावत' ची करुन दिली आठवण

मनुकुमार, कोमलने सुशीलशी वाद घालत त्याला मारहाण केली. त्यात सुशील पूर्ण बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत मनुकुमारने सुशीलला त्याच्या गाडीत बाजूला बसवले. त्यानंतर मित्राच्या मदतीने गाडी मुबई नाशिक महामार्गांवरून कसाराच्या दिशेने नेली.

जुना कसारा घाट क्रॉस करून ते नवीन घाटात आले. तिथे गणपती मंदिर लगतच्या दरीत त्यांनी सुशीलला फेकले. परंतु सुशील पूर्ण पणे मयत नसल्याचे मनुकुमारच्या लक्षात आल्याने त्याने माेठ्या दगडाने सुशीलला ठेचले. त्यात सुशिल याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मनुकुमार आणि कोमलला ताब्यात घेण्यात आले आहे. मनुकुमार याच्या मित्राचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com