Jantar Mantar protest Saam Tv
महाराष्ट्र

Jantar-Mantar Protest: जंतरमंतरवर लाठीमार व्हावा ही कॉक्रोच जनता पार्टीची इच्छा होती; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Ramdas Athavale On Jantar-Mantar Protest: रामदास आठवले यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जबाबत मोठं विधान केले आहे. लाठीचार्ज व्हावा अशी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची इच्छा होती, असा आरोप केला.

Priya More
  • जंतर-मंतरवरील लाठीचार्ज कुणाच्या सांगण्यावरून झाला?

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपकेवर केला गंभीर आरोप

  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज व्हावा अशी सीजेपी नेत्यांची इच्छा होती असा आरोप

  • नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते

नीट पेपर फुटीप्रकरणावर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केल. हे आंदोलन महिनाभर सुरू होते. विद्यार्थी आपल्या मागण्यावर ठाम राहिले आणि अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

या लाठीचार्जवरून राजकारण अद्यापही तापलेले आहे. हा लाठीचार्ज कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप देखील केले जात आहेत. अशामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याच मुद्द्यावरून थेट कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप केला आहे.

यवतमाळ येथे माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी अभिजीत दिपकेबाबत प्रतिक्रिया दिली. 'योग्य वेळेला अभिजीत दिपकेने मुद्दा उचलल्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. लाठीचार्ज व्हावा अशी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची इच्छा होती. लाठीचार्ज झाल्या शिवाय चर्चा होत नाही. अनेक वेळेला आम्ही आंदोलनं केली आहेत. आम्ही देखील बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर दगड फेकल्यावर ते लाठीचार्ज करतातच. ', असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

यावेळी रामदास आठवले यांनी संजय राऊत यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना देखील सडेतोड उत्तर दिलं. रामदास आठवले यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लोकं आम्हाला सत्तेत आणतात असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'नरेंद्र मोदी ७ ते ८ महिने पंतप्रधान राहणार असं त्याचं म्हणण आहेत. मात्र माझ असं म्हणणं आहेत की, राहुल गांधी २० वर्षे विरोधात असतील. हे सर्व लोकांवर अवलंबून आहे आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. सत्तेत येण्याची हौस नाहीये, पण लोकं आम्हाला सत्तेत आणतात.'

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील आहेत. कितीही बाजू मांडली तरी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजुने निर्णय येईल असा आम्हाला विश्वास आहे. उद्धवजीना त्यांचे आमदार सांभाळता आले नाही. पक्षातून बाहेर पडायचा त्यांना अधिकार आहेत. सध्याच्या कायदा असा आहे की टूथ मेजॉरिटी इलेक्शन कमिशनने तोच धागा पकडून एकनाथ शिंदेंना पक्ष-चिन्ह दिलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT