माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर, विशेष प्रतिनिधी
CJP, Abhijeet Deepke : नीट (NEET) पेपर लीकप्रकरणी दिल्लीच्या जंतर-मंतरवर महिनाभर चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आता आपला पुढचा मोठा प्लॅन आखत आहे. सीजेपीचे संस्थापक आणि 'जेन-जी' आयकॉन अभिजीत दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ५ ऑगस्ट रोजी पक्षाच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सीजेपी आता प्रत्यक्ष राजकारणात उतरणार की केवळ एक सामाजिक चळवळ म्हणून काम करणार? याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर आणि तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. देशभरातील विद्यार्थी आणि स्वयंसेवकांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे अभिजीत दीपके या बैठकीत भविष्यातील रणनीती निश्चित करतील, असे सांगण्यात येत आहे. ५ ऑगस्टच्या या बैठकीनंतर अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील रणनितीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजतेय. तयामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) कोर टीमची ५ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय रणनीती बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाचे संस्थापक, प्रवक्ते आणि संघटनात्मक नेतृत्व या युवा चळवळीच्या पुढील वाटचालीवर विचारमंथन करण्यासाठी उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांत CJP च्या टीमने पक्षाची पुढील दिशा काय असावी, यावर विविध घटकांशी सविस्तर चर्चा केली आहे. यामध्ये जंतर-मंतर येथील आंदोलनात पूर्ण वेळ योगदान देणाऱ्या ५० प्रमुख स्वयंसेवकांच्या टीमचाही समावेश आहे.
CJP देशभरातील आपल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असून, तरुणांच्या गरजा व आकांक्षा समजून घेण्यासाठी एका राष्ट्रव्यापी 'लिसनिंग टूर'चे (संवाद दौऱ्याचे) आयोजन करणार आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरलेल्या CJP च्या आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर, देशातील तरुण पिढी भारताच्या भविष्याबद्दल कमालीची आशावादी आणि उत्साही झाली आहे.
"या अहंकारी सरकारचा तरुणांच्या हातून झालेला पराभव हेच दर्शवतो की, जेव्हा तरुण एकत्र येतात तेव्हा ते काहीही साध्य करू शकतात," असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले. तसेच, "तरुणांच्या अपेक्षांचे एका अर्थपूर्ण कृतीत रूपांतर करण्यासाठी आमची टीम सर्वोत्तम मार्ग तयार करण्याचे काम करत आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. CJP येत्या काही दिवसांत आपल्या पुढील वाटचालीची रूपरेषा आणि राष्ट्रव्यापी 'संवाद दौऱ्याच्या' वेळापत्रकासह अधिक माहिती जाहीर करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.