Manasvi Choudhary
भारतीय स्वयंपाकघरात आणि जेवणात तुपाला विशेष महत्व आहे. आपल्यापैकी अनेकजण पोळीला किंवा चपातीला तूप लावून खातात.
तुपाचे आरोग्यासाठी अनेक जबरदस्त फायदे आहेत, पण जेव्हा बाजारातून तूप खरेदी करता, तेव्हा गाईचे तूप घ्यावे की म्हशीचे तूप? हा प्रश्न अनेकांना पडतो.
गाईचे आणि म्हशीचे तूप एकसारखेच दिसत असले, तरी त्यांची चव, पोत आणि शरीरावरील परिणाम वेगवेगळे असतात. आरोग्याच्या दृष्टीने कोणते तूप अधिक चांगले आहे, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप नैसर्गिकरीत्या हलक्या पिवळसर रंगाचे असते. हे दिसायला पातळ आणि हलके असते.
म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप अगदी पांढऱ्याशुभ्र रंगाचे आणि घट्ट पोताचे असते.
गाईचे तूप पचायला हलके असते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे, त्यांच्यासाठी गाईचे तूप फायदेशीर आहे.
म्हशीचे तूप थोडे जड असते. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा शरीराला जास्त उर्जा हवी आहे, त्यांच्यासाठी म्हशीचे तूप फायदेशीर ठरते.
गाईच्या तुपामध्ये फॅट्सचे प्रमाण संतुलित असते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मात्र, कोणत्याही प्रकारचे तूप खाताना त्याचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे, कारण अतिसेवनामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
योग्य प्रमाणात तूप सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.