शरद पवार करणार दुष्काळ दौरा
३ ऑक्टोबर रोजी शरद पवार करणार दुष्काळ दौऱ्याला सुरुवात
पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार शरद पवार भेटी
दुष्काळ दौऱ्यादरम्यान एक सभा आणि शेतकऱ्यांशी करणार संवाद
बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांचा करणार शरद पवार दौरा
आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थी प्रतिनिधींची घोषणा. आज वरचे सर्व रेकॉर्ड तुटतील इतक्या जागा भरणार मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आले आहे. 30 ते 40 पदोन्नती झालेल्या नव्हत्या भरती नियम 1960 पासून नवीन सुधारणा झाल्या नव्हत्या त्यामुळे 30 ते 40% जागा भरण्याची परवानगी दिली जायची आता 60% विभागाचे ते नियम तयार केले त्यामुळे पूर्ण जागा भरण्याची तयारी झाली आहे.
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असून त्यांनी मिनाक्षी शिंदे यांचे नाव एफआयरमध्ये टाकवे अशी मागणी केलीय.
एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे विद्यार्थ्यांना आश्वासन
सोबतच, एमपीएससी परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेण्यात येणार
ज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झालीय. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर वातावरण शांत होण्याची शक्यता. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे.अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान हा अर्ज नेण्यात आला. याच दिवशी भाजप नेते तथा विधान परिषदेचे आमदार/सभापती राम शिंदे यांनीही अर्ज घेतला असून, लंके यांच्यासोबत अजित पवार गटाचे दत्तात्रय पानसरे दिसल्याने जिल्ह्यात नवीन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी दिग्गजांनी अर्ज नेल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी होणार निवडणूक तर सर्वसाधारण मतदारसंघातील 14 जागांसाठी 1360 ठराव झाले आहे प्राप्त...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्या साठी हालचाली सुरू असतांना राम शिंदेंच्या अर्जामुळे धक्का?
राधाकृष्ण विखे यांना सुजय विखे बाळासाहेब थोरातांच्या बैठकीची माहिती नसेल तर बिनविरोध निवडणूक कशी होणार?’ — राम शिंदेचा सवाल...
विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस
अनेक ठिकाणी सखल भागात साठलं पाणी
दिवसभराच्या उष्णतेने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना मिळाला दिलासा
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते मोशीदरम्यान तब्बल १० किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.या वाहतूक कोंडीत अवजड वाहनांसह प्रवासी आणि कामगार वाहतूक अडकले असून, नित्याचीच वाहतूक कोंडी आता डोकेदुखी ठरत आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करणे, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा. तसेच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पात १८४ रहिवाशांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी टायकून समूहाचे बिल्डर श्रीकांत शितोळे यांच्यासह चेतन सराफ, महेश गोसावी आणि अन्य संबंधितांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख पुरणेकर यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बोलावली तातडीची बैठक बोलवण्यात आले.
आज संध्याकाळी साडेचार वाजता मातोश्री येथे बैठक पार पडणार आहे.
तसेच संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे देखील ठाणे येथे जाऊन पुरणेकर यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट...
नांदेड जिल्ह्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद होऊ लागलं आहे. मुदखेड तालुक्यातील बारड परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाचा खंड पडल्याने विहिरी आणि बोअरवेल आटल्या असून, वाढत्या तापमानाचा फटकाही केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
बारड येथील शेतकरी प्रकाश देशमुख यांनी दोन एकर क्षेत्रावरील केळीचे पीक चॉप कटरच्या साहाय्याने नष्ट केले. वाढत्या तापमानामुळे केळी झाडावरच पिकू लागल्याने मागणी घटली असून, केळीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे प्रकाश देशमुख यांनी आपल्या शेतातील केळीची बागच उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद हे पाच दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत असून, महाराष्ट्र प्रभारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. उद्यापासून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत.
यासोबतच सिरीवेल्ली प्रसाद विस्तारित कार्यकारिणीचीही बैठक घेणार आहेत. संघटनात्मक पातळीवरील गटबाजी रोखण्यासाठी ते ज्येष्ठ नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करणार असून, पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी आणि संशयास्पद कारभाराचा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. लोकशाही संस्थेचा गैरवापर करून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला.
मतचोरीच्या मुद्द्यावर आता आम्ही माघार घेणार नाही
देशाच्या लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
जनतेचे वोट चोरी करण्यात आलेत
ज्ञानेश कुमार चोर आणि डाकू आहेत
एकही क्षण ज्ञानेश कुमारांनी पदावर राहू नये
ज्ञानेश कुमारांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे
राहुल गांधी जे बोलत होते ते योग्य होतं हे आता लोकांना पटतंय
सर्वपक्षिय खासदारांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन
देशभरात लोकशाही वाचवा असं आंदोलन करणार
भाजप मत चोरी करून निवडणूका जिंकत आहेत
निवडणूक आयोगाविरोधात सर्वजण एकजुटीने लढा देऊ
मोदी आणि शाह आयोगाला आपल्या तालावर नाचवत आहेत
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर उबाळे नगर येथे बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. एर्टिगा कार अचानक रस्त्यावर आडवी आल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या बसखाली दुचाकी गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रामचंद्र भोईटे (वय ५१, रा. खांदवे नगर, वाघोली) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सांगोला तालुक्यातील महूद येथील मराठा बांधव सुभाष भोसले यांच्या डिफेंडर गाडीचा वापर केला होता. दौरा संपल्यानंतर जरांगे पाटील याच डिफेंडर गाडीने जालना येथील आपल्या निवासस्थानी गेले होते. नुकतेच रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ही डिफेंडर गाडी पुन्हा सांगोल्याकडे रवाना झाली.
दरम्यान, माळशिरस तालुक्यातील संगम येथील मराठा बांधव गणेश इंगळे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेल्या या डिफेंडर गाडीची विधिवत पूजा केली. यावेळी गाडीचे मालक सुभाष भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेल्या या गाडीची पूजा करण्यात आल्याने डिफेंडर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रसंगामुळे मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडीतून येत उमेदवारी अर्ज दाखल केला. बँकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच पडळकरांनी कार्यकर्त्यांसोबत हलगीच्या तालावर ठेका धरला. हातात चाबूक घेऊन जल्लोष करत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपींसह आयोगाच्या अध्यक्षांनाही वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा पवार यांनी केला आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या संभाव्य बंडाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. भाजपचे माजी आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला.
सचिन वाझेच्या जामिनाविरोधात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी एनआयएकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू असून, ७ ऑक्टोबरपर्यंत जामिनाच्या अंमलबजावणीवर स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त आहे.
वाशिम शहराजवळील संत गजानन महाराज पेट्रोल पंपावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास चोरट्याने केबिनमध्ये प्रवेश करून टेबलखाली ठेवलेल्या चावीने लॉकर उघडला. लॉकरमधील हजारो रुपये घेऊन चोरटा पसार झाला; विशेष म्हणजे त्यावेळी केबिनमध्ये दोन कर्मचारी झोपलेले होते. चोरीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदे याला कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हत्येच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी पुढील तपास कापूरबावडी पोलीसांकडून सुरू असून, हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोग्राळे येथील बालिका अत्याचार प्रकरणाची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुनावणी पुढे ढकलल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई -
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन निधीतील सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा नियोजन निधीतील सिमेंट रस्त्यांच्या कामांवर मर्यादा आणण्याचे आदेश सूत्रांची माहिती
अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणीच निधी खर्च करण्याची परवानगी
दुष्काळी परिस्थितीत निधीचा वापर पाणीपुरवठा आणि अत्यावश्यक कामांसाठी करण्यावर भर देण्याचे आदेश
हिंगोली -
हिंगोलीच्या सेनगाव येथील शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा
तांदूळ आणि गहू आणि साखरेत किडे-भुंगे, जनावरेही खाणार नाहीत अशा धान्याचे लाभार्थ्यांना वाटप
दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलखोल
वर्धा -
तहसील कार्यालय आवारातून जप्त ट्रॅक्टर-ट्रॉली भरदिवसा लंपास
CCTV फुटेजमध्ये दिसणारे दोघे पोलिसांच्या रडारवर
पुणे- शिक्षक मतदारसंघात मतदार यादीमध्ये घोळ
प्राध्यापक सचिन सानप यांनी केली हायकोर्टात याचिका दाखल
पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचिका
पुणे -
पुणे–अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा बळी,वाघोली खांदवे नगर परिसरात भीषण अपघात
दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला खासगी ट्रॅव्हलर बसने धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.वाघोली वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ग्रामपंचायतींच्या जनसुविधांना मोठी चालना, विशेष अनुदानातून नवीन कामांचा समावेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शाळा-अंगणवाडी, स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सुरक्षा भिंत व सीसीटीव्हीला निधीची तरतूद
पुणे -
चाकण औद्योगिक वसाहतीत १४०० कोटींचा विकास आराखडा
तरीही मंत्र्यांची बैठक रद्द; चाकणमधील उद्योजक आक्रमक
मुंबई -
ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड
ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?
ST महामंडळाचे एमडी यांनी बोलावली संचालक मंडळाची तातडीची बैठक
ST बँकेत २३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप
स्पेशल ऑडिट आणि फॉरेन्सिक ऑडिटला कार्योत्तर मंजुरी देण्याचा ठराव
ST बँकेच्या स्पेशल ऑडिट आणि फॉरेन्सिक अहवालावर कारवाईची रूपरेषा ठरवण्याबाबत होणार चर्चा
स्पेशल ऑडिट आणि फॉरेन्सिक अहवालानुसार कारवाई झाल्यास बडे मासे अडकण्याची शक्यता
मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
अरबी सागरात भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; 526 किलो हाय-ग्रेड ड्रग्ज जप्त
गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाची संयुक्त कारवाई
आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 3 हजार कोटी रुपयांहून अधिक
25 सप्टेंबर रोजी लक्षद्वीपच्या पश्चिमेला अरबी सागरात कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे संशयित इराणी धौवर पाळत ठेवून कारवाई
ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?
ST महामंडळाचे एमडी यांनी बोलावली संचालक मंडळाची तातडीची बैठक
ST बँकेत २३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप
कोकणात देखील दुष्काळाची परिस्थिती
कोकणातील भात हे प्रमुख पीक मात्र पावसाअभावी पिक वाया
दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागाकाकडून पंचनामेला सुरुवात
कारखान्यांची धुराड पेटले कामगार ऊसतोड मुकादम संघटना संपावर.
साखर आयुक्तांना संपाचे पत्र, तीन वर्षाचा करार संपल्याने कामगार संघटना ऊसतोड मुकादम वाहतूकदार यांनी संप पुकारला.
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेत खळबळ!
नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांच्या कागदपत्रांची चौकशी
निवडणुकीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
थकबाकी असतानाही ‘थकबाकी नाही’चे दाखले दिल्याचा दावा
पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण
बदलत्या वातावरणाचा परिणाम
1 कोटी 45 लाख रुपयांचे गांजाची रोपे पोलिसांनी केली जप्त..
अक्कलकोट तालुक्यातील आळगीत ऊसातील गांजाची 240 रोपे केली जप्त
मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवर निष्कासनाला एनसीपी चा विरोध
मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करू नये, एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांची मागणी
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत निवेदन सादर
दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका
पावसाअभावी संत्र हंगाम महिनाभर लांबणीवर
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक...
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोणारमध्ये ग्रामस्थ आक्रमक
नागपूर करार १९५३ ची प्रतिकात्मक होळी
विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या
विकास, सिंचन आणि रोजगारासाठी लोणारकरांचा एल्गार
ठाण्यातील मानपाडा येथील उद्धव ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या
आज परिसरातील तीन शाळा अणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पोलिसानी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
तिघांचा शोध सुरू आहे.
आष्टी पोलिसांची मध्यरात्री फिल्मी कारवाई
बहादूरपूर जंगलात सापळा रचून चारचाकीचा पाठलाग
2000 निपा अवैध देशी दारूसह 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
दोन तस्करांना अटक
परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण.
मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; परळी शहर ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.