Surabhi Jayashree Jagdish
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. एका केळ्यामध्ये साधारण ४२२ मिलीग्रॅम पोटॅशियम आणि ०.४ मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी६ असू शकते.
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे ते शरीराला ऊर्जा देणारा सोपा स्नॅक ठरू शकतो. त्यामुळे वर्कआउटच्या आधी केळं खाल्ल्यास व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. वर्कआउटनंतरही ते खाता येतं.
केळं आणि दूध एकत्र घेणं अनेकांसाठी चांगला आहाराचा पर्याय ठरू शकतो. केळ्यातून कार्बोहायड्रेट, तर दुधातून प्रोटीन आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे केळं-दूध शेक किंवा स्मूदी असं तुम्ही खाऊ शकता.
रात्री केळं खाणं हानिकारक नाही. रात्री केळं खाल्ल्यानंतर पचनाची कोणतीही अडचण होत नसेल तर ते खाऊ शकता. मात्र केळं खाल्ल्यानंतर पोट जड होणं किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ते दिवसाच्या दुसऱ्या वेळी खाणं अधिक सोयीचं ठरतं.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी केळं खाताना त्याच्या प्रमाणाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट असल्यामुळे त्याचा रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. किडनीच्या आजारात शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढण्याची क्षमता कमी होऊ शकते.
केळं खाण्यासाठी एकच ‘परफेक्ट वेळ’ नाही. त्यामुळे सकाळी नाश्त्यात किंवा वर्कआउटच्या आधी किंवा नंतर ते खाऊ शकता. काही लोकांना रात्री केळं खाल्ल्यावरही कोणतीही त्रास होत नाही, त्यामुळे अशा वेळी रात्रीही ते खाता येते.
केळी पौष्टिक असली तरी केवळ ती खाऊन शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे आहारात केळ्यासोबत इतर फळं, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचाही समावेश करावा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.