Alisha Khedekar
सकाळी अंडी खाल्ल्याने दिवसाची सुरुवात प्रथिने आणि पोषक घटकांनी होते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
नाश्त्यात अंडी घेतल्याने प्रथिनांचे सेवन वाढते. व्यस्त दिवसातही शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळण्यास मदत होते.
व्यायाम करणाऱ्यांनी अंडी आहारात समाविष्ट केल्यास प्रथिने मिळतात. स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी ते उपयुक्त ठरू शकतात.
रात्री अंडी खायची असल्यास झोपण्याच्या अगदी आधी खाणे टाळा. पचनासाठी थोडे अंतर ठेवणे चांगले.
उकडलेली अंडी हा साधा पर्याय आहे. अतिरिक्त तेल किंवा लोणी न वापरल्याने अनावश्यक कॅलरी वाढण्याचे टाळता येते.
बहुतेकांसाठी सकाळचा नाश्ता सोयीचा पर्याय आहे. मात्र संध्याकाळी खाल्ली तरी अंड्याचे पोषणमूल्य कमी होत नाही.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा