Jalna Samruddhi Highway Accident death Toll update : साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident : समृध्दीवर भयंकर अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा

Jalna Samruddhi Highway Accident death Toll update : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ट्रकने पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अनेक महिला मजुरांचा समावेश असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Jalna Samruddhi Highway Accident 8 People Dead : जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने महिंद्रा पिकअपला जोरात धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. या दुर्दैवी आणि भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक महिला मजूरांचा समावेश होता. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर लेकरांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे काळीज चिरले.

बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या आसपास नागपूर ते मुंबई या समृध्दी महामार्गावर जालन्यातली कवडची परिसरात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महिंद्रा पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यु झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही धडक इतकी भयंकर होती की पिकपअचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातामधील जखमींना तातडीने जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले.

स्थानिक प्रतनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काही स्थानिक महिलांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी गवत काढण्याच्या कामासाठी बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील काही कामगार महिलांना बोलवण्यात आले होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर महिला पिकअपमध्ये समृद्धी महामार्गाने जात होत्या. पण त्याचवेळी काळाने घाला घातला.

समृध्दी महामार्गावरील जामवाडी परिसरात पिकअप व्हॅन थांबवली होती. त्यावेळी नागपूरकडून मुंबईच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटले अन् पिकअपला जोरात धडक दिली. ट्रकची ही धडक एवढी भीषण होती की ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी अपतानंतर जालना जिल्ह्यात शोककळा पसरली. एकाचवेळी ८ जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघातावर दुख व्यक्त केले.

जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

मोठी बातमी! पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा

SCROLL FOR NEXT