Jalna Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Jalna News : कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली असून जिल्ह्यात 93793 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यात नुकसान झाले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. साधारण १५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल ९३ हजार ७९३ हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान घनसावंगी तालुक्यामध्ये झाले आहे. 

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. प्रामुख्याने शेती पिकांना याचा अधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. जालना जिल्ह्यात देखील १५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून यात कपाशी, सोयाबीन, तूर यासह फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 

नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता 

जिल्ह्यात नुकसानीबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जालना जिल्ह्यातील ९३ हजार ७९३ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार घनसावंगी तालुक्यात ४१ हजार २९ हेक्टर क्षेत्र, अंबड तालुक्यात २३ हजार ९८६ हेक्टर, जालना तालुक्यात २६ हजार १७१ हेक्टर आणि बदनापूर तालुक्यात २ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रांवर नुकसान झाले आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

SCROLL FOR NEXT