Dharashiv : मुसळधार पावसाने नद्यांना महापूर; चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहिला, पोलिसांना वाचविण्यात यश

Dharashiv News : धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीच्या पुरात परंडा तालूक्यातील वाहून गेलेल्या तरुणाला पहाटेच्या दरम्यान बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. रात्रभर तरुण झाडाचा आधार घेऊन बसला होता
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी- नाल्यांना मोठे पूर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने जवळपास सर्वच नद्यांना पूर आले आहे. यात परांडा तालुक्यातील चांदणी नदीच्या पुरात तरुण वाहून जात होता. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ता तरुणाला वाचविण्यात यश मिळाले आहे. यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. 

गेल्या तिन- चार दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सिना नदीसह उल्पा, चाँदणी या नद्यांना पुर आला आहे. यात चांदणी नदीला पुर आल्याने वारदवाडी ते भूम जाणाऱ्या रोडवरील वाकडी पुलावर पाणी आले असुन साकद खुर्द येथिल हनुमंत कांबळे हे भूमकडे जात त्यांनी पुलावरून वाहत असलेल्या पुराच्या पाण्यातून मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न केला. 

Dharashiv News
Onion Price : कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळावा; ग्रामसभेत एकमताने ठराव

पुराच्या प्रवाहात मोटारसायकलसह तरुण गेले वाहून 

मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने १७ सप्टेबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल पाण्यामध्ये वाहून गेली. तर हणुमंत कांबळे वाहून गेला होता. मात्र नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाला पकडन आधार घेतला. यानंतर त्याने घरी फोन करून पुरात आडकल्याची माहिती दिली. मात्र यात तरुणाची मोटारसायकल वाहून गेली आहे. 

Dharashiv News
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; सिंदखेडराजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप, साचलेल्या पाण्यात आंदोलन

पोलिसांनी सुखरूप काढले बाहेर 

घटनेची माहिती परंडा पोलिसांना देण्यात अली होती. यानंतर पोलीसांनी तात्काळ घटणास्थळी धाव घेऊन कांबळे यांचा शोध सुरू केला. अंधार असल्याने कांबळे यांचा शोध कामात अडसर येत होता. यामुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी अखेर वाकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने हणूमंत कांबळे यांना पहाटे सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com