Brave Jalgaon cop Sandeep Patil injured during cattle smuggling operation; despite attack, he managed to nab two smugglers after a 100 km chase. Saam TV News
महाराष्ट्र

Jalgaon : धक्कादायक! जळगावात पोलिसावर गुन्हेगाराचा हल्ला, गाडी अंगावर घातली, संदीप पाटील थोडक्यात वाचले

Senior inspector attacked during cattle smuggling chase in Jalgaon : जळगावात तस्करांनी पोलिसांवर गाडी घालून हल्ला केला. संदीप पाटील गंभीर जखमी झाले. तरीही त्यांनी आरोपींना पकडत शौर्य दाखवलं. नागरिकांत कौतुकाचं वातावरण.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Sandeep Patil injured as smugglers reverse car to run over police : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुरांच्या तस्करीप्रकरणी कारवाई करताना जीवघेणा हल्ला झाला. मुक्ताईनगर परिसरात गस्त घालत असताना तस्करीच्या वाहनाचा पाठलाग करताना आरोपींनी चारचाकी वाहन रिव्हर्स घेऊन पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पाटील थोडक्यात वाचले असले तरी त्यांच्या बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

घटना घडली तेव्हा पाटील आणि त्यांचे पथक गुरांच्या तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत होते. जळगाव ते अकोल्यापर्यंत तब्बल १०० किलोमीटरचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी अकोला पोलिसांच्या सहाय्याने नाकाबंदी केली. यावेळी आरोपींनी पाटील यांच्यावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पाटील खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली, परंतु त्यांनी हार न मानता धाडसाने आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरीचा बैल, चारचाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती आणि लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. संदीप पाटील यांच्या या धाडसी कारवाईचे पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. जखमी अवस्थेतही त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी दाखवलेली चिकाटी आणि निष्ठा यामुळे त्यांचे नाव झळकले आहे. सध्या पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील गुरांच्या तस्करीविरुद्ध पोलिसांच्या कठोर कारवाईचे महत्त्व अधोरेखित करते. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT