Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू

Mumbai Rain News Update : अंधेरीच्या मरोळमध्ये पावसामुळे मातीचा ढिगारा कोसळून ५ जण अडकले. एकाचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या मदतीने अन्य कामगारांना वाचवण्यात आलं.
Mumbai Rain News Update
Fire officials rescue trapped workers after a mudslide at a Marol construction site in Mumbai. One 27-year-old worker was declared dead before hospital admission. Saam TV News
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Heavy Rain in Mumbai : मुंबईत काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी विविध अपघात घडले. कुठे वृक्ष उन्मळून पडले तर कुठे रस्ता खचला तर कुठे इमारतीची भिंत कोसळली. अशा या वेगवेगळ्या अपघातात अनेक जण जखमी झाले असाच एक अपघात मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात घडला. मरोळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणचा मातीचा ढिगारा घसरल्याने त्याखाली चार ते पाच कामगार अडकले अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीने मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र यातील एका कामगाराचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात खासगी विकासकामार्फत इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी मोठा मातीचा ढिगारा होता मात्र काल दिवसभर मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हा मातीचा ढिगारा घसरला याखाली चार ते पाच कामगार अडकल्याची दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या चारही कामगारांना बाहेर काढले यातील एका कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. सोनेलाल प्रसाद वय 27 वर्ष असं मृत कामगाराचे नाव आहे.

Mumbai Rain News Update
Samruddhi Mahamarg : गेम चेंजर समृद्धी महामार्गावर अंधारात लूटमार, बोगद्यांमध्ये दगडफेक, व्हिडिओतून समोर आलं वास्तव

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात पाठवले.आमदार मुरजी पटेल यांनी याप्रकरणी पोलिसांनी योग्य तो तपास करून महापालिकेने देखील या कामाची आणि घटनेची योग्य चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत

Mumbai Rain News Update
Weather Forecast : देशावर चक्रि‍वादळाचे सावट, महाराष्ट्रासह २४ राज्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com