Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : गिरणा नदीच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; वाळू उपोषणे झालेल्या खड्ड्यामुळे गेला बळी

Jalgaon News : गिरणा नदीपात्रात सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी बऱ्यापैकी वाहती झाली आहे. काम आटोपून मंगल सायंकाळी घरी परतत असताना गिरणा नदी पात्रातील नेहमीच्या पायवाटेने येत होता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गिरणा नदीतून होत असलेल्या वाळू उपशामुळे नदी पात्रात झालेल्या खड्ड्यात साचलेल्या (Jalgaon) पाण्यात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडाला. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा (Death) मृत्यू झाला. (Latest Marathi News)

मंगल इघन बाविस्कर (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार येथील मंगल बाविस्कर हा तरुण मजुरीचे कामे करत होता. दरम्यान १८ डिसेंबरला सकाळी कामावर गेला होता. गिरणा नदीपात्रात (Girna River) सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी बऱ्यापैकी वाहती झाली आहे. काम आटोपून मंगल सायंकाळी घरी परतत असताना गिरणा नदी पात्रातील नेहमीच्या पायवाटेने येत होता. मात्र नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांनी सापडला मृतदेह 
सदरचा प्रकार लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी शोध घेतला. काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृतदेह हाती लागला नाही. अखेर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो नेण्यात आला. मयताच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT