Kolhapur News : लोकनियुक्त सरपंचाच्या शेतात भानामती करणीचा प्रकार; साहित्य जमा करत केली होळी

Kolhapur News : संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे
Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv
Published On

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : लोकनियुक्त सरपंच पदावर निवडून आलेल्या सरपंचाला पदभार स्वीकारायला वर्षपूर्ती झाली. त्याच दिवशी त्यांच्या शेतात भानामती करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार (Kolhapur) कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे या गावात समोर आला आहे. (Tajya Batmya)

Kolhapur News
Erandol Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जणांचा मृत्यू, महिला गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावचे लोकनियुक्त (Sarpanch) सरपंच संदीप पोळ यांच्या निवडून आले. त्यांच्या निवडीला आज एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यान एका बाजूला सरपंच पदाची वर्षपूर्ती होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur News
Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्र्यांकडे सगळे रिपोर्ट असतात त्याआधारेच बोलले असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

त्या साहित्याची केली होळी 

सदरची बाब संदीप पोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत त्याची होळी केली आहे. करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ सालीच कायदा बनवल्याचं संदीप पोळ यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com