Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्र्यांकडे सगळे रिपोर्ट असतात त्याआधारेच बोलले असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Nanded News : छत्रपतींच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे वचन दिले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : मागच्या सरकारच्या काळात काही चुकीचे झाले असेल तर विद्यमान सरकार ते काढत असते. काही चुकीच झालं असेल म्हणुन मुख्यमंत्री बोलले असतील. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, त्यांच्याकडे सगळी माहिती असते. (Nanded) मागच्या काळात काय काय झाल याचा रिपोर्ट असतो, त्या रिपोर्टच्या आधारे मुख्यमंत्री बोलले असतील; अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. (Live Marathi News)

Chandrashekhar Bawankule
ATM Crime: दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सुरक्षा रक्षकाचा मोबाईल घेऊन चोरटे पसार

मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. छत्रपतींच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे वचन दिले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मराठा समजला आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे असे बावनकुळे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bawankule
Erandol Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जणांचा मृत्यू, महिला गंभीर

त्यांनी ६५ वर्ष कोणत्याही समाजाला न्याय दिला नाही
काँगेस पार्टीला आरक्षणावर बोलायचा अधिकार नाही. समाजासमाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करुन जनतेला यांनी संभ्रमित केले. मतांच्या (Congress) राजकारणासाठी लांगुनचालण करुन नीचपना केला. जनतेत संभ्रम निर्माण करुन मत घेतली. ६५ वर्ष सत्तेत राहून कोणत्याही समजाला न्याय दिला नाही; अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपला आरक्षण द्यायचे नाही. जाती जातीत वाद निर्माण करून सगळे आरक्षण संपवायचे; अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिली होती. त्यावर बावनकुळे बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com