Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका; चोपडा मतदारसंघात प्रचाराला जातानाच झाला त्रास

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मतदारसंघात प्रचाराला जाताना त्रास जाणवू लागल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रणधुमाळीत उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे हे आज (३१ ऑक्टोम्बर) सकाळी मतदारसंघात प्रचारासाठी जळगाव येथील घरापासून मार्गस्थ झाले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा दिनेश सोनवणे हे देखील सोबत होते. दरम्यान जळगाव (Jalgaon) तालुक्यातील ममुराबाद गावाच्या जवळ गेले असताना त्यांना त्रास जाणवू लागला. याबाबत त्यांनी मुलाला सांगितले, असता डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले असता त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली. 

दरम्यान प्रभाकर सोनवणे यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. तर त्यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. तब्येत आता चांगली असून ते लवकरच बरे होऊन प्रचारासाठी बाहेर पडतील असे मुलगा दिनेश सोनवणे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT