Sanjay Raut Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : पान टपरीवाल्याला घरी बसवायची वेळ आली; संजय राऊत यांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला

संजय महाजन

जळगाव : सगळ्यात मोठी गद्दारी जळगाव जिल्ह्यात झाली आहे. अडीचशे खोके घेऊन घरात बसून आता आपली सभा ऐकत आहेत. पण आता महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला आमदार, मंत्री केले. पण आता या पान टपरीवाल्याला घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे म्हणत; खासदार (Sanjay Raut) संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Breaking Marathi News)

जळगाव (jalgaon) व रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सभेत खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी राऊत यांनी बोलताना (BJP) भाजपवर देखील निशाणा साधला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४०० पार नाही तर तडीपार करू 

महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे. ४ जूननंतर यांना बाहेर फिरता येणार नाही. निवडणूक होईपर्यंत तुतारी आणि मशाल घराघरात पोहोचवा. गद्दारांना निष्ववंतांची ताकद काय असते हे दाखऊन द्या. महाराष्ट्र लुटायचे म्हणून भाजपने दोन पक्ष फोडले. मात्र त्यांना आता ४०० पार नाही, तर आम्ही तडीपार करेल. चारशे पार करायचे कि नाही हे जनता ठरवेल. आम्हाला जेलमध्ये टाकले नंतर तुमचा नंबर आहे. मोदी देश भर गॅरंटी देत आहेत. पण तुम्ही विजय होणार का त्याची गॅरंटी नसल्याचे म्हणत राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT