Jayant Patil News : खडसेंचा विषय जुना झाला; खडसेंच्या राजीनाम्याबाबत जयंत पाटलांनी बोलणे टाळले

Jalgaon News : रावेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जळगाव येथे जयंत पाटील आले असता ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते
Jayant Patil
Jayant Patil Saam tv

जळगाव : एकनाथ खडसे भाजपत जाणार हे खडसेंनी स्वतःच सांगितलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे राजीनामा दिला. खडसेंचा (Eknath Khadse) विषय जुना झाला असून नवीन काही विचारा. तसेच खडसेंचा राजीनामा आणि लोकसभा निवडणुकीचा संबंध नाही; असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मांडत अधिक बोलणे टाळले. (Tajya Batmya)

Jayant Patil
Sunil Shelke News : भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्याकडे घेऊन जाणारा मोरक्या कोण?; सुनील शेळके यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीसाठी (Raver) रावेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी (Jalgaon) जळगाव येथे जयंत पाटील आले असता ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil
Navapur Crime : घरगुती वादातून पत्नीची हत्या; पती फरार, पोलिसात गुन्हा दाखल

अनिल पाटलांवर साधला निशाणा 

मंत्री अनिल पाटील यांच्याबद्दल विचारले असता कोण अनिल पाटील? म्हणून जयंत पाटील यांनी उल्लेख केला. तसेच असे बरेच भुरटे आमच्यातून गेले आहेत. परंतु निष्ठेचे जे आहेत ते तुतारी वाजविल्याशिवाय राहणार नाहीत. अमळनेरात तुतारी अनिल पाटलांचा पराभव करणार असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com