नंदुरबार : परी- पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या सततच्या होत असलेल्या वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार (Navapur) करत पत्नीचा खून केला. ही धक्कादायक घटना मरोड (ता. नवापूर) येथे घडली. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित आरोपी पतीचा शोध घेण्यात येत आहे. (Live Marathi News)
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील मरोड (ता. नवापूर) येथे हि घटना घडली असून कोकिलाबाई रंजीत पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. कोकिलाबाई व पती रंजित पाडवी हे गावात वास्तव्यास होते. दरम्यान (Crime News) संशयित रंजीत पाडवी (वय ५९) आणि त्याची पत्नी कोकिलाबाई यांच्यात सतत वाद होत होते. पती दारू पिऊन येत असल्याने अगदी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान २२ एप्रिलच्या रात्री देखील कोकिलाबाई व रंजीत यांच्यामध्ये वाद झाले. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भारत रंजीत याने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान कामजाभाई रमाभाई कोठवाड्या (वय.३८, रा गवाण, ता. उचछल जि.वापी, गुजरात) यांच्या माहितीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.