Sunil Shelke News : भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्याकडे घेऊन जाणारा मोरक्या कोण?; सुनील शेळके यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Beed News : आपण पहिला टर्मचे आमदार आहात. आपल्या भावना जरूर मांडल्या पाहिजे. परंतु आपण देखील किती पाण्यात आहे, हे जनतेला माहित आहे.
Sunil Shelke Rohit Pawar
Sunil Shelke Rohit PawarSaam tv

बीड : भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे. आपण सत्तेत जायला पाहिजे. असे सांगून २२ जुन २०२२ रोजी वाय बी सेंटरला (Sharad Pawar) शरद पवार साहेबाकडे कोण घेऊन चालले होते. आमच्या सर्व आमदारांचा मोरक्या कोण होता?; असा उल्लेख करत आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आमदार रोहित पवार यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला.  (Latest Marathi News)

Sunil Shelke Rohit Pawar
Orange Alert : चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; अकोल्यासह चार जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस 

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबद्दल धक्कादायक गोप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी करताना रोहित पवार आज निष्ठेची भाषा बोलतात. आपण पहिला टर्मचे आमदार आहात. आपल्या भावना जरूर मांडल्या पाहिजे. परंतु आपण देखील किती पाण्यात आहे, हे जनतेला माहित आहे. अधिक खोलात न जाता योग्य वेळी आपले तोंड बंद करावं. अन्यथा आम्ही या आठवड्यात तोंड उघडणार; असा इशारा सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sunil Shelke Rohit Pawar
Parola Accident : दुचाकी घसरताच मायलेकाच्या अंगावरून गेले टँकर; एक वर्षाच्या चिमुकल्यासह आईचा मृत्यू

विकास कोणी केला जनतेला माहित आहे 
लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना बारामतीमध्ये विकास कोणी केला आहे. हे जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे सुमित्रा पवार या दोन लाख मताने विजय होतील; असा विश्वासही सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com