अक्षय गवळी
अकोला : राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान आज चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ (Yavatmal) या तिन जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा राहणार; असा इशारा देण्यात आला आहे. तर अकोल्यासह (Akola) चार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra News)
राज्यात मागील आठवड्यापासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. अजून देखील काही भागात पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर अमरावती आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह बादळ आणि सोसाट्याचा वारा त्याचा वेग ४०-५० किमी प्रति तासापर्यंत असण्याची शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उद्या वादळी वाऱ्याची शक्यता
दरम्यान अकोला, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपुर: आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह बादळ आणि सोसाट्याचा वारा (वेग ३०-४० किमी प्रति तासापर्यंत) वेगळ्या ठिकाणी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. तर २५ एप्रिलला चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि सोसाट्याचा वारा वेगळ्या ठिकाणी राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागात दिलाय.
काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन-
दोन दिवस वादळी वर व पावसाची शक्यता असल्याने संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरातील आश्रय घ्या. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारा पासून दूर राहा. उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी घराला संपूर्ण- हाउस सर्ज प्रोटेक्टरसह सुसज्ज करा. झाडांखाली आश्रय घेऊ नका आणि विशेषतः वेगळ्या झाडाखाली, जसे की वीज चालवणे. गडगडाटी वादळादरम्यान तुम्ही गटात असाल तर एकमेकांपासून वेगळे व्हा; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.